Sunday , September 20 2026
Breaking News

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये शेतकऱ्यांसमवेत पर्यावरण दिन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन शेतकरी, पालकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेच्या परिसरात रोप लागवड करुन पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य स्नेहा घाटगे होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून समर्थ निंबाळकर, बाळकृष्ण पाटील, संदीप पाटील, हरी कागले, सुशीला कागले, संजय खराडे उपस्थित होते. शेतकरी बांधवांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पर्यावरणाचे मानवी जीवनातील महत्त्व, वृक्षांचे संवर्धन, निसर्गाशी असलेले नाते आणि भविष्यातील पर्यावरणीय आव्हाने याबाबत मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका घाटगे यांनी पर्यावरणसंवर्धनासाठी शाळेच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. श्लोक मलाबादे व गौरांग घोटणे यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *