Sunday , July 26 2026
Breaking News

व्हॅक्सिन डेपोमध्ये स्वच्छता मोहीम जारी

Spread the love

 

बेळगाव : व्हॅक्सीन डेपो प्लास्टिक मुक्त करण्याचा चंग बांधलेल्या समर्थ भारत प्रतिष्ठानच्या वतीने सुभाष चंद्र नगरचे रहिवासी आणि उद्योजक आप्पासाहेब गुरव आणि सुरज नेतलकर यांनी या रविवारीही सकाळी वॅक्सीन डेपो परिसर स्वच्छ केला. दोनच दिवसांपूर्वी साजरा झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्यांनी हा उपक्रम राबविला.
मागच्या रविवारी त्या भागात पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या व इतर विखुरलेले साहित्य जमा करताना त्यांना अनेकांनी सहकार्य केले होते.
आज रविवारी सकाळी वॉकिंग पाथच्या दोन्ही बाजूला वळचणीत पडलेला कचरा आज त्यांनी जमा केला. फिरावयास आलेले अनेक जण आजही त्यांच्या मदतीला धावले आणि बघता बघता बराचसा कचरा जमा झाला.
पुढील रविवारी व्हॅक्सिन डेपो परिसरात पसरलेल्या बाटल्या जमा करण्याची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. या उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केले.
आज या स्वच्छता मोहिमेत स्वतः आप्पासाहेब गुरव, सुरज नेतलकर, श्रीनिवास पाटील, मिलिंद चौगुले, अविनाश खन्नुरकर, मधु गुरव, राहुल आंबेवाडी, सुरेश भट, वेदांती नेतलकर, स्नेहा गुरव, अभिनव देसाई यांच्यासह आदिती रेडेकर, समीक्षा नावगेकर यांनीही भाग घेतला. त्यांच्या समवेत ईवान व शौर्य ही दोन बालकेही सरसावली होती. लोकांनी पर्यावरणाचे संरक्षण लक्षात घेऊन प्लास्टिक व इतर कचरा टाकू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *