Sunday , July 26 2026
Breaking News

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मित्रा फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण

Spread the love

 

बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मित्रा फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी फाऊंडेशनच्या सदस्यांनी विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली.
या उपक्रमात फाऊंडेशनचे पदाधिकारी, सदस्य, महिला वर्ग, युवक तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उपस्थितांनी झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन करण्याची शपथ घेतली. वाढते प्रदूषण, वृक्षतोड आणि बदलते हवामान यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
“निसर्गाचा नका करू ऱ्हास, हाच आहे मानवाचा खरा श्वास” हा संदेश देत मित्रा फाऊंडेशनने पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती केली. झाडे ही केवळ ऑक्सिजनचा स्रोत नसून जलसंपदा, जैवविविधता आणि मानवी जीवनाचे संरक्षण करणारी नैसर्गिक संपत्ती असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
मित्रा फाऊंडेशनच्या “आपला समाज, आपला व्यवसाय” या ब्रीदवाक्यानुसार समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात असून भविष्यातही पर्यावरण संरक्षणासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *