Sunday , September 20 2026
Breaking News

शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी निपाणीत गर्दी

Spread the love

 

वह्यावर ५ टक्के जीएसटीचा भार ; पालकांच्या खिशाला कात्री

निपाणी‌ (वार्ता) : नवीन शैक्षणिक क्षेत्राला प्रारंभ झाल्याने शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी व पालकांची येथील बाजारपेठेत गर्दी होत आहे. छापील पुस्तके व वह्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्के झाला आहे. त्यातच तयार वहीवर ५ टक्के जीएसटी लागत असल्याने त्याची पालकांना आर्थिक झळ बसत आहे.
जून महिना सुरू होताच पालकांची शालेय साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरू झाले आहे. अशोक नगर, नेहरू चौक ‌परिसरात शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांची झुंबड उडत आहे. काहीमहिन्यांपासून युध्दजन्य परिस्थिती, इंधनाची दरवाढ, त्यातून कागद तयार करण्यासाठी लागणारा कच्च्या माल (कागदाचा लगदा) किंमतीमध्ये वाढ झाल्याने यंदा शैक्षणिक साहित्याच्या किंमती दहा टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. यामध्ये प्लॅस्टिकची वॉटर बॉटल, वॉटर बॅग, कंपासपेटी, रेनकोट यांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. इंधन दरवाढीचा फटका दळणवळणावर होत असल्याने त्याचा परिणाम वस्तूंच्या दरवाढीवर झाला आहे. काही वह्यांची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी कोणतीही वाढ केली नसून काहींनी विक्रेत्यांना देण्यात येणारी सवलत कमी केली आहे.
पाठ्यपुस्तकांची एकदा छपाई केल्यानंतर ते पुन्हा छापावे लागत नाही. कागदावरील जीएसटी वाढल्याने नोटबुकच्या किंमतींमध्ये मात्र वीस ते तीस रूपयांची वाढ झाल्याचे व्यवसाय त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *