Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणीतील हिंदू खाटीक समाजातर्फे सिद्धेश्वर, बिरदेवाची वार्षिक वार्षिक यात्रा उत्साहात

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील हिंदू खाटीक समाजाचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर बिरदेवाची वार्षिक यात्रा रविवारी (ता.७) भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यात्रेनिमित्त श्री बिरदेवाची पालखी मिरवणूक खरी कॉर्नर येथून प्रारंभ करण्यात आली. शिवाजीनगर, अंबाबाई मंदिर, यरनाळ रोड ते बिरदेव मंदिर पर्यंत काढण्यात आली. यावेळी आंबील कलश घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. पालखीचे ठिकठिकाणी रांगोळी घालून फटाक्याची आतशबाजी करून स्वागत करण्यात आले. सकाळी ८ वाजता श्री सिद्धेश्वर बिरदेवास राहुल फुटाणकर दाम्पत्याच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. ढोल वाद्याच्या तालावर ही मिरवणूक बिरदेव मंदिरात नेण्यात आली. पालखी प्रदक्षिणा, तलवार खेळण्याचा कार्यक्रम झाल्यावर नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचा सुमारे २ हजार भाविकांनी लाभ घेतला.
आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार सुभाष जोशी, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, माजी सभापती बाळासाहेब देसाई सरकार, डॉ. जसराज गिरे, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, राजू गुंदेशा, प्रणव मानवी, संतोष सांगवकर, अभिनंदन मुदकुडे, रवींद्र कदम, प्रसाद औंधकर यांच्यासह मान्यवरांनी श्री बिरदेवाचे दर्शन घेतले. धनगरी ओव्यांचा कार्यक्रम झाल्यावर सायंकाळी वाशी येथील पुजारी यांचा भाकणूक कथन कार्यक्रम झाला. त्यानंतर भंडारा फोडून यात्रेची सांगता करण्यात आली. यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी रवींद्र घोडके, धनाजी क्षीरसागर, संजय चिकोडे, बाबासाहेब घोडके, राजेश शेडगे, बाळासाहेब जोरापुरे, सुधाकर घोडके, सुनील जोरापुरे, सुनील काळगे, अनिल फुटाणकर, राजू लाटकर, दिगंबर शारबिद्रे, सिद्धार्थ बिद्रे, ओंकार लाटकर, मिलिंद घोडके यांच्यासह खाटीक समाजातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *