Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

गणेशोत्सव महामंडळ पदाधिकाऱ्यांनी केली कपिलेश्वर तलावाची पाहणी

  बेळगाव : मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर व महामंडळाचे कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद आपटेकर यांची आज कपिलेश्वर तलावाची पाहणी केली. बेळगावातील काही विविध भागातील गणेश भक्तांनी महामंडळाचे अध्यक्ष कोंडुस्कर यांना फोन करून विसर्जन तलाव स्वच्छतेसंदर्भात काही अडचणी सांगितल्या. त्याचे दखल घेऊन तातडीने विसर्जन तलावाला आज 29 सप्टेंबर …

Read More »

महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्याविरोधात विविध संघटनांच्या वतीने सोमवारी मोर्चा

  बेळगाव : महानगरपालिकेच्या भ्रष्ट आणि ढिसाळ कारभारामुळे कोट्यवधींच्या विकासकामावर पाणी सोडण्याची वेळ बेळगाव महानगरपालिकेवर आली आहे. लोकप्रतिनिधींच्या हुकूमशाहीमुळे महानगपालिकेवर ही नामुष्की ओढवली असून महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात सोमवारी सकाळी ११ वाजता सरदार्स मैदान येथून आयोजित केलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष, समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी …

Read More »

मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र – दसरा उत्सव महामंडळाची स्थापना; अध्यक्षपदी प्रा. आनंद आपटेकर

  बेळगाव : दरवर्षी शहर आणि उपनगरात नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव काळात येणाऱ्या अडचणी सोडवून घेण्यासाठी तसेच, उत्सव अतिशय चांगल्याप्रकारे पार पडावा, यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र – दसरा उत्सव महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रा. आनंद आपटेकर यांची निवड करण्यात आली आहे. नवीन …

Read More »

आमदार राजू सेठ यांच्या प्रयत्नातून धर्मवीर संभाजी उद्यानाचा विकास

  बेळगाव : महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी उद्यान येथे सर्वत्र मातीचे ढिगारे तसेच कचरा साचला होता. पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचल्याने मैदानात चिखल होत होता. त्यामुळे मैदान सुस्थितीत करून द्यावे, अशी मागणी स्थानिकांनी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी धर्मवीर संभाजी उद्यान येथील कचरा तसेच मातीचे ढिगारे …

Read More »

कस्तुरीरंगन अहवाल कर्नाटक सरकारने फेटाळला; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

  खानापूर : पश्चिम घाटातील संवेदनशील क्षेत्रांच्या बाबतीत टास्क फोर्सने केवळ रिमोट सेन्सिंग डेटाच्या आधारे संवेदनशील क्षेत्राची ओळख निश्चित केली आहे. त्यामुळे डॉ. के. कस्तुरीरंगन अहवालावरील केंद्राच्या मसुद्यातील सूचना जशाच्या तशा स्वीकारल्यास स्थानिक जनतेला अपरिमित त्रास सहन करावा लागेल, अशी भीती व्यक्त करत राज्य सरकारने कस्तुरीरंगन अहवाल पूर्णपणे फेटाळून लावला …

Read More »

बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्यास फाशी

  पोक्सो न्यायालयाचा आदेश; रायबाग तालुक्यातील घटना बेळगाव : तीन वर्षाच्या बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून ठार मारणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा पोक्सो न्यायालयाने शुक्रवारी (दि. २७) सुनावली. कुरबगोडी (ता. रायबाग) येथे २१ सप्टेंबर २०१७ रोजी दोषी नराधम उद्दप्पा रामाप्पा गाणगेर (वय ३२) याने शेजारच्या तीन वर्षाच्या बालिकेला चॉकलेटचे …

Read More »

केंद्रीय मंत्री सीतारामन व इतरांविरुध्द एफआयआर दाखल

    लोकप्रतिनिधी न्यायालयाचे निर्देश; निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे उकळल्याचा आरोप बंगळूर : येथील लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतर नेत्यांविरुद्ध आता रद्द केलेल्या निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे उकळल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने बंगळुरमधील टिळक नगर पोलीस ठाण्याला निवडणूक बाँड योजनेशी संबंधित फसवणुकीच्या आरोपांची …

Read More »

गणेबैल टोलनाकावाल्यांची पुन्हा अरेरावी

  खानापूर : गणेबैल टोलनाक्यावर सामान्य जनतेला अजून त्रास देणे चालूच आहे. आज गणेबैल टोलनाक्यावर एक जणांची गाडी अडविली. सदर व्यक्तीने मासिक पास दाखविला तरी सुद्धा गणेबैल टोलचालकांचा अरेरावीपणा चालूच होता. शेवटी त्या सन्माननीय गृहस्थानी आपली गाडी आहे तिथेच टोलवर सोडून दुसऱ्या गाडीत बसून खानापूर गाठले. सामान्य लोकांना त्रास द्यायचा …

Read More »

महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात विविध संघटनांच्या वतीने सोमवारी भव्य निषेध मोर्चा

  बेळगाव : महानगरपालिकेच्या भ्रष्ट आणि ढिसाळ कारभारामुळे कोट्यवधींच्या विकासकामावर पाणी सोडण्याची वेळ बेळगाव महानगरपालिकेवर आली आहे. लोकप्रतिनिधींच्या हुकूमशाहीमुळे महानगपालिकेवर ही नामुष्की ओढवली असल्याची खंत जाणकार व्यक्त करत आहेत. बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते ओल्ड पी.बी. रोड रास्ता तसेच खंजर गल्ली येथील रस्ता हे एक ताजे उदाहरण आहे. अशी अनेक …

Read More »

माय मराठी ग्रुपतर्फे राघवेंद्र इनामदार यांना सन्मानपत्र

  राजगोळी : चंदगड तालुका मराठी अध्यापक संघामार्फत नुकताच राजगोळी हायस्कूलचे अध्यापक राघवेंद्र इनामदार यांना चंदगड तालुका मराठी प्रेरणा पुरस्कार मिळाला. यानिमित्ताने माय मराठी ग्रुपतर्फे राघवेंद्र इनामदार यांना त्यांच्या घरी सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी माय मराठीचे अध्यक्ष रविंद्र पाटील म्हणाले की “शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल होत आहे. इनामदार …

Read More »