Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

सुभाषचंद्र नगरात श्रावण उत्सव साजरा

  बेळगाव : नवी पिढी संस्कृती, सणवार विसरत चालली आहे हे लक्षात घेऊन सुभाषचंद्रनगरातील महिला, मुली व लहान मुलांना एकत्रित करून त्यांना हिंदू संस्कृतीतील उत्सवांची माहिती द्यावी या उद्देशाने सुभाषचंद्र नगर महिला मंडळाच्या वतीने समुदाय भवनांमध्ये नुकताच श्रावण उत्सव साजरा केला. श्रावण महिन्यातील सोमवारची शंकराची पूजा, मंगळागौरीची पूजा, नागपंचमी, नारळी …

Read More »

बेळगावात गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेसतर्फे राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा

  बेळगाव : गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेस फौंडेशन, बेळगाव या संस्थेच्यावतीने कर्नाटक राज्य 11 वर्षांखालील खुल्या गटाकरिता फिडे रेटेड चेस चॅम्पियनशिप-2024 तसेच कर्नाटक राज्य मुलींकरिता 11 वर्षांखालील वयोगटासाठी बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीनगर-बेळगाव येथील गुजरात भवन येथे शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट ते रविवार दिनांक 1 सप्टेंबर पर्यंत …

Read More »

पायोनियर बँकेला दोन कोटीचा निव्वळ नफा : चेअरमन प्रदीप अष्टेकर यांची माहिती

  बेळगाव : येथील पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने गेल्या आर्थिक वर्षात दोन कोटी 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून बँकेची 118 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या शनिवार दि. 31 ऑगस्ट 2024 रोजी लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळ गल्ली, बेळगाव येथे संपन्न होत आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर यांनी …

Read More »

सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे २ सप्टेंबर रोजी आयोजन

  बेळगाव : सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी मराठा मंडळ येथे जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार उपस्थित राहणार आहेत. कै. अर्जुनराव घोरपडे यांनी बेळगाव सहकार क्षेत्राला एक नवीन दिशा दाखवून दिली आहे. …

Read More »

आंतरराज्य दुचाकी चोरट्याला निपाणी पोलिसांकडून अटक

  बेळगाव (वार्ता) : निपाणी पोलिसांनी एका अट्टल आंतरराज्य चोरट्याला अटक करून 10 मोटरसायकली जप्त केल्या असून गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी गावातील विशाल संजय मोरे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. निपाणी हालसिद्धनाथ मंदिराजवळ निपाणी बसवेश्वर पोलीस ठाण्याचे पीएसआय रमेश पवार हे ड्युटीवर असताना हा मोटरसायकल चोर पोलिसांच्या हाती लागला. पडलीहाळ …

Read More »

अभिनेता दर्शनला बेळ्ळारी कारागृहात हलवले!

  बेळ्ळारी : चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी यांच्या हत्येच्या आरोपाखाली बेंगळुरूच्या परप्पन येथील अग्रहार कारागृहात कैद असलेल्या अभिनेता दर्शन आता बेळ्ळारी कारागृहात आज गुरुवारी सकाळी चोख पोलीस बंदोबस्तात हलवण्यात आले. अभिनेता दर्शनला तुमकूर येथून क्यातसांद्र टोलमार्गे बेळ्ळारी येथे नेण्यात आले. दरम्यान, आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अभिनेता …

Read More »

अभिनेता दर्शनच्या न्यायालयीन कोठडीत १३ दिवसाची वाढ

  बंगळूर : बेळ्ळारी कारागृहात हलवण्यात येणार असलेला अभिनेता दर्शन याला तुरुंगात शाही पाहूणचार मिळत असल्याने चर्चेत आला आहे. दरम्यान, त्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज पुन्हा वाढवण्यात आली आहे. दर्शन हा रेणुकास्वामी हत्याकांडातील मुख्य आरोपी असून न्यायालयाने त्याच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १३ दिवसांची वाढ केली आहे. अभिनेता दर्शनसह सर्व आरोपींना …

Read More »

मुडा घोटाळा : सिद्धरामय्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी

  सुनावणीकडे सर्वांचे लक्ष्य बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) प्रकरणात राज्यपाल थावरचंद यांच्या खटल्याला दिलेल्या मंजुरीच्या कायदेशीरतेला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या याचिकेवर उच्च न्यायालय उद्या (ता. २९) पुन्हा सुनावणी सुरू करणार आहे. राज्यपालांनी १६ ऑगस्ट रोजी प्रदीप कुमार एस. पी., टी. जे. अब्राहम आणि स्नेहम यांच्या याचिकांमध्ये …

Read More »

चलवेनहट्टी येथे चौथरा बांधण्याच्या कामाचा शुभारंभ

  बेळगाव : चलवेनहट्टी येथील स्मशानभूमीत अंत्यविधीचा चौथरा तसेच शेड व‌ प्रेत जाळण्याचे स्टँड उभारणीच्या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्ष अमृत मुद्देनव्वर यांच्या हस्ते करण्यात आला. नुतन स्मशानभूमी कार्यान्वित होऊन दोन वर्षे उलटून गेली होती पण शेड तसेच स्टँड नसल्याने अतंविधिच्या वेळी ग्रामस्थांना अडचणी समाना करावा लागत होता. पावसाळ्यात ही परिस्थिती …

Read More »

खानापूरात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाला तरूणांनी वाचविले

  खानापूर : जीवनाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्धाला वाचवण्यात खानापूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांना यश आले. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास खानापूर नगरपालिकेजवळील पुलावरील पायऱ्यांवरून मलप्रभा नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब लक्षात येताच शेडेगाळी गावचे सामाजिक कार्यकर्ते राजू गुरव, रुमेवाडी येथील प्रभाकर सुतार, करंबळ येथील मारुती …

Read More »