Monday , September 21 2026
Breaking News

सुभाषचंद्र नगरात श्रावण उत्सव साजरा

Spread the love

 

बेळगाव : नवी पिढी संस्कृती, सणवार विसरत चालली आहे हे लक्षात घेऊन सुभाषचंद्रनगरातील महिला, मुली व लहान मुलांना एकत्रित करून त्यांना हिंदू संस्कृतीतील उत्सवांची माहिती द्यावी या उद्देशाने सुभाषचंद्र नगर महिला मंडळाच्या वतीने समुदाय भवनांमध्ये नुकताच श्रावण उत्सव साजरा केला. श्रावण महिन्यातील सोमवारची शंकराची पूजा, मंगळागौरीची पूजा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा व श्रीकृष्ण जन्माष्टमी का व कशा पद्धतीने साजरे केले जातात त्याची माहिती देण्यासाठी सुंदर रीतीने पूजांची मांडणी करण्यात आली होती.
हॉल रांगोळ्या, फुलमाळा आणि चक्क दहीहंडी बांधून सजविण्यात आला होता. श्रावणाची चाहूल लागण्यापूर्वी वासुदेव येऊन लोकांना श्रावण येतोय हे कसे सुचित करतो ते दाखवण्यासाठी महिला व मुलांनी सुंदर नृत्य केले. त्यानंतर शंकराची पूजा, मंगळागौरीचे खेळ सादर करून वाहव्वा मिळवली. नागपंचमीचा सण नृत्य व खेळाद्वारे साजरा केला. नारळी पौर्णिमेदिवशी कोळी लोक सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करून आपला आनंद कसा साजरा करतात त्याचे दर्शन घडवले. सजविलेला पाळणा बांधून श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली.
शेवटी गोविंद आला रे आला म्हणत दहीहंडी चे दर्शन घडवले. हे सर्व कार्यक्रम महिला मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य रेशमा करडे, शिवानी करडे, सोनम करडे, राधिका तेंडुलकर, अंजू पंडित, केतकी शहापूरकर, शीला हंगिरगेकर, प्रेमा गुरव, अलका नाकील यांनी विशेष परिश्रम घेऊन सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन शीला हंगिरगेकर तर सूत्रसंचालन विद्या इटि यांनी केले. सह भोजनानंतर या अतिशय सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात महिला आणि मुले, मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *