Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

अंकलीमध्ये राघवेंद्र स्वामी मठात ३५३ वा आराधना उत्सव संपन्न

  सदलगा : राघवेंद्र स्वामी आराधना हा १६व्या शतकातील आदरणीय संत आणि मध्वाचार्यांच्या द्वैत तत्त्वज्ञानाचे समर्थक श्रीगुरू राघवेंद्र स्वामी यांच्या भक्तांनी साजरा केलेला एक महत्त्वाचा धार्मिक कार्यक्रम आहे. २०२४ मधील आराधना हा ३५३ वा आराधना महोत्सव झाला. राघवेंद्र आराधना तीन दिवस म्हणजे मंगळवार, २० ऑगस्ट: पूर्वा आराधना बुधवार, २१ ऑगस्ट: …

Read More »

बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे अविनाश पोतदार यांचा वाढदिवस साजरा

  बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांचा क्लबतर्फे 70 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे अविनाश पोतदार यांना शाल, श्रीफळ आणि गुलाबाचे रोपटे देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्व सभासदांनी अविनाश पोतदार यांचे अभिष्टचिंतन करून दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली. यापुढेही …

Read More »

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक

  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवार दिनांक २५ रोजी दुपारी ठीक दोन वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नवीन कार्यकारिणीबाबत व इतर विषयाबद्दल चर्चा करण्याबद्दल ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला …

Read More »

बालिकांवरील अत्याचाराचा मराठी विद्यानिकेतनमध्ये निषेध!

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेमध्ये आज 24 ऑगस्ट रोजी कोलकत्ता व महाराष्ट्र या ठिकाणी शाळकरी मुलींच्या वर झालेल्या अत्याचाराचा सर्व विद्यार्थ्यांनी व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपूर्ण दिवसभर काळ्या फिती बांधून व काळे कपडे परिधान करून या घटनेचा निषेध केला. सध्या वाढत असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटना आपल्या …

Read More »

चिक्कोडीजवळ कारमधील सिलिंडरचा स्फोट

  चिक्कोडी : व्यवसायानिमित्ताने चिक्कोडी येथे आलेल्या कुटुंबियांच्या कारमध्ये सिलिंडर स्फोट झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या गावातून चिक्कोडी येथे माता – शिशु रुग्णालयासमोर टेन्ट घालण्यासाठी सदर कुटुंब आपल्या वॅगन आर कार मधून आले होते. दरम्यान कारमधील सिलिंडरचा स्फोट होऊन कारमधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून ज्ञानसिंग कलासिंग चितौड यांचे …

Read More »

दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांची संगत केल्यास मनुष्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते : परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज

  बेळगाव : दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांची संगत केल्याने मनुष्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याला इतिहासही अपवाद नाही त्यामुळे वैष्णवानी अभक्त आणि कुसंगांचा संग करू नये” असे आवाहन इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी आपल्या कथानकात केले. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रीकृष्ण कथा महोत्सवाच्या तिसऱ्या …

Read More »

धनश्री सोसायटी म्हणजे ठेवीदारांचा विश्वास!

  “इवलेसे रोप लाविले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी” या उक्तीप्रमाणे गेल्या 31 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या व अल्पावधीतच नावारूपास आलेल्या अनगोळ मेन रोड येथील दि. धनश्री मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे प्रशस्त अशा स्वतःच्या इमारतीत उद्या रविवार (ता. 25) रोजी सकाळी साडेदहा वाजता स्थलांतर होत आहे त्यानिमित्त संस्थेच्या कार्याचा घेण्यात आलेला आढावा…. …

Read More »

हत्तरगी येथील श्री हरी काका गोसावी मठात दिनांक 26, 27, 28 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी विविध कार्यक्रम

  डॉ. आनंद महाराज गोसावी यांची माहिती बेळगाव : हत्तरगी (ता. जि. बेळगाव ) येथील पुरातन श्री हरी काका गोसावी भागवत मठाचे वतीने दिनांक 26, 27, 28 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सवाची तयारी झाली आहे. यानिमित्ताने विविध आध्यात्मिक, संगीत सेवा यासह गोपाळ काला कार्यक्रम आयोजित करण्यात आला …

Read More »

निपाणीत मुस्लिम समाजाचा विराट मोर्चा

  रामगिरी महाराजांवर कारवाई करा; तहसीलदारामार्फत पंतप्रधानांना निवेदन निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र मधील नाशिक जिल्ह्यातील रामगिरी महाराजांनी धर्म आणि अल्लाहच्या शरियतचा प्रचारक आणि तत्वज्ञानाचा विरोधी वक्तव्य केले आहे. ईश्वरानंतर आदरणीय, मुहम्मद अल मुस्तफा अहमद अल मुजतबा यांचा अवमान केला होता. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.२३) येथील मुस्लिम समाजाने मूक मोर्चा काढून महाराजांवर …

Read More »

पीओपी गणेशमूर्ती विकल्यास सावधान; मंत्री ईश्वर खांड्रे यांचा कडक इशारा

  बंगळूर : यावेळी गौरी गणेशोत्सवादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींवर बंदी घालण्याचे निर्देश वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर बी. खांड्रे यांनी दिले. सर्व जिल्हा प्रशासनांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या वापरावर कटाक्ष ठेवण्याचे त्यांनी निर्देश दिले. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आणि जलस्रोत प्रदूषित करणाऱ्यांवर हवा आणि जल कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, …

Read More »