Sunday , June 7 2026
Breaking News

बालिकांवरील अत्याचाराचा मराठी विद्यानिकेतनमध्ये निषेध!

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेमध्ये आज 24 ऑगस्ट रोजी कोलकत्ता व महाराष्ट्र या ठिकाणी शाळकरी मुलींच्या वर झालेल्या अत्याचाराचा सर्व विद्यार्थ्यांनी व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपूर्ण दिवसभर काळ्या फिती बांधून व काळे कपडे परिधान करून या घटनेचा निषेध केला. सध्या वाढत असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटना आपल्या देशासमोरील खूप भयंकर घटना असून या घटना तात्काळ थांबवाव्यात. त्याचबरोबर लहान मुले व विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवावी व त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे निवेदन शाळेचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी यावेळी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गजानन सावंत, एन सी उडकेकर, संयोजक नीला आपटे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून या सर्व घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी मोठ्या प्रमाणात पालकही उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मुक्तांगण विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

Spread the love  बेळगाव : आदर्श गुण विकास प्रतिष्ठान संचलित मुक्तांगण विद्यालय, भाग्यनगर येथे शुक्रवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *