Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हायकमांडचे अभय

  राज्यातील राजकीय परिस्थितीची दिली माहिती बंगळूर : मुडा प्रकरणात राज्यपालांनी आपल्याविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज राज्याच्या राजकारणातील घडामोडींची माहिती हायकमांडला दिली. काँग्रेस हायकमांडने सिध्दरामय्या यांना संपूर्ण अभय दिले असून राजकीय व कायदेशीर मार्गाने लढा देण्यास सूचविले असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री आणि केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार …

Read More »

भारताचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर

  नवी दिल्ली : टीम इंडियाचा ‘गब्बर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शिखरने आपल्या अधिकृत X या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. निवृत्तीची घोषणा करताना त्याने चाहत्यांचे आभार देखील मानले आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओत शिखर धवन म्हणतो, …

Read More »

जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

  बेळगाव : जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मोहन कारेकर होते तर व्यासपीठावर सेक्रेटरी शिवराज पाटील व खजिनदार अशोक हलगेकर उपस्थित होते. प्रारंभी मोहन कारेकर यांनी स्वागत केले. शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अशोक …

Read More »

कर्नाटकातील रस्ता दुरुस्तीसाठी महाराष्ट्रातील नागरिकांचा रास्तारोको

  बेळगाव : महाराष्ट्राच्या सीमेनजीक कर्नाटक हद्दीत अत्यंत खराब झालेल्या बेळगाव – वेंगुर्ला रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील संतप्त वाहनचालक आणि नागरिकांनी शुक्रवारी सकाळी कर्नाटक- महाराष्ट्र सीमेवरील शिनोळीजवळ भव्य रास्ता रोको आंदोलन करून चक्काजाम केला. बेळगाव – वेंगुर्ला या रस्त्याची महाराष्ट्र सीमेजवळ कर्नाटक हद्दीत खड्डे पडून वाताहत …

Read More »

प्रा. आनंद आपटेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

  बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते प्रा. आनंद आपटेकर यांचा वाढदिवस सांबरा येथील माऊली लॉन येथे अनोख्या रीतीने नुकताच साजरा झाला. चव्हाट गल्लीतील देवदादा ज्योतीबा सासनकठी मंडळ, शिवजयंती मंडळ, बेळगावचा राजा गणेशोत्सव मंडळ, सावरकर ग्रुपसह विविध मंडळाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अन् त्यांना दीर्घायुष्य लाभण्याची कामनाही केली. यावेळी त्यांच्या उत्तम …

Read More »

तुकाराम बँकेला 61 लाख 57 हजार 85 रुपयांचा निव्वळ नफा : चेअरमन प्रकाश मरगाळे

  सभासदांना 13 टक्के लाभांश जाहीर बेळगाव : श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शहापूर -बेळगाव या सहकारी बँकेने आर्थिक वर्षात 61 लाख 57 हजार 85 रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून संस्थेने यंदा सभासदांसाठी 13% लाभांश जाहीर केला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन प्रकाश आप्पाजी मरगाळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली …

Read More »

सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी स्वागत समितीची बैठक

  बेळगाव : सहकार महर्षी कैलासवासी अर्जुनराव गोविंदराव घोरपडे जन्मशताब्दीच्या स्वागत समिती सभासदांची बैठक आज सायंकाळी पाच वाजता मराठा मंदिर खानापूर रोड येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वागत समितीचे अध्यक्ष श्री. बाळाराम पाटील हे होते. प्रारंभी जिजामाता बँकेचे व्यवस्थापक श्री. नितीन आनंदाचे यांनी सर्व उपस्थित यांचे स्वागत करून मागील बैठकीचा …

Read More »

समरजित घाटगेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; 3 सप्टेंबर रोजी तुतारी फुंकणार

  कोल्हापूर : फक्त कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील आश्वासक चेहरा असलेल्या भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी भाजपला अखेर सोडचिठ्ठी दिली आहे. आज (23 ऑगस्ट) कागलमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समरजित यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली. त्यामुळे गेल्या …

Read More »

नेपाळमध्ये नदीपात्रात बस कोसळून महाराष्ट्रातील 14 भाविकांचा मृत्यू

  जळगाव : महाराष्ट्रातील 40 पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात राज्यातील 14 प्रवाशांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. हे सर्व भाविक भुसावळचे आहे. यामध्ये 31 जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीपात्रात बस …

Read More »

शिवाजी विद्यापीठ मराठी विभागाच्या वतीने ज्येष्ठ लेखक महादेव मोरे यांना अभिवादन

  कोल्हापूर : मराठीतील ज्येष्ठ लेखक महादेव मोरे यांचे दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. लेखक महादेव मोरे यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पिठाची गिरण चालवली. जगण्यासाठी चाललेल्या विविध व्यापातूनही आपल्या साहित्य लेखणीत कधीही खंड पडू दिला नाही. कथा, कादंबरी, ललित अशा विविध साहित्य …

Read More »