Monday , September 21 2026
Breaking News

सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी स्वागत समितीची बैठक

Spread the love

 

बेळगाव : सहकार महर्षी कैलासवासी अर्जुनराव गोविंदराव घोरपडे जन्मशताब्दीच्या स्वागत समिती सभासदांची बैठक आज सायंकाळी पाच वाजता मराठा मंदिर खानापूर रोड येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वागत समितीचे अध्यक्ष श्री. बाळाराम पाटील हे होते. प्रारंभी जिजामाता बँकेचे व्यवस्थापक श्री. नितीन आनंदाचे यांनी सर्व उपस्थित यांचे स्वागत करून मागील बैठकीचा वृत्तांत वाचून दाखविला. दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या जन्मशताब्दी कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकांचे यावेळी वाटप करण्यात आले. बेळगावातील सर्व प्रमुख संस्था आणि नागरिक यांना निमंत्रण पत्रिका पाठवून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. समारंभाच्या दिवशी होणारा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शांतपणे व दिमाखदारपणे कसा होईल यावर सभासदांनी सभासदांनी आपापली मते मांडली. कार्यक्रमाच्या वेळी सभासदांनी घ्यावयाची खबरदारी याविषयी चर्चा करण्यात आली. कार्यक्रम वेळेवर सुरू करून वेळेवर संपविण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने कार्य करण्याचे ठरले. या प्रसंगी माजी आमदार मनोहर किनेकर, मराठा मंदिरचे श्री. अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, मराठा बँकेचे चेअरमन श्री. दिगंबर पवार, जिजामाता बँकेच्या चेअरपर्सन भाविका राणी होनगेकर, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, रामचंद्र मोदगेकर, गोपाळराव पाटील, यांनी आपले विचार मांडले.

या प्रसंगी श्री. संजय मोरे, श्री. शिवाजी हंगिरगेकर, श्री. बी एस पाटील, श्री. गजानन घोरपडे, श्री. महादेव चौगुले, श्री गोपाळराव देसाई खानापूर, श्री. ईश्वर लगाडे इत्यादी सदस्य हजर होते .श्री संजय गुरव यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *