Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

आम. अभय पाटील यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश : सुजित मुळगुंद

  बेळगाव : भ्रष्टाचार, बेकायदेशीर भूसंपादन आणि वारसाहक्क या आरोपाखाली बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकार आणि लोकायुक्तांना दिले आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद यांनी दिली आहे. शनिवारी बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या १२ वर्षांपूर्वी …

Read More »

योगा-बुद्धिबळ स्पर्धेत कामधेनू शालेय मुलांचे सुयश

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या आणि श्री बनशंकरी एज्युकेशन ट्रस्ट संचालित तात्यासाहेब मुसळे कन्नड प्राथमिक व माध्यमिक शाळा आयोजित प्राथमिक विभागीय वडगाव-खासबाग क्लस्टर विभागाच्या योगा आणि बुद्धिबळ स्पर्धेत येथील कामधेनू शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या स्पर्धेत विविध शालेय विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. बुद्धिबळ स्पर्धेत 14 वर्षांखालील वयोगटात …

Read More »

घर कोसळून जखमी झालेल्या महिलेच्या प्रकृतीची मंत्री हेब्बाळकर यांच्याकडून विचारपूस

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावात सततच्या पावसामुळे घर कोसळून एक महिला जखमी झाली असून मंत्री हेब्बाळकर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. घराची भिंत कोसळून झालेल्या या घटनेत पार्वती होदेप्पा हुदली (३१) ही महिला जखमी झाली आहे. तिच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी …

Read More »

सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेने स्वतःच साखळीने बांधून घेतल्याचा अंदाज

  सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात एक मूळ अमेरिकन महिला साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. या अमानवी घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर या महिलेला अधिक उपचारासाठी सिंधुदुर्गमधून रत्नागिरी येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान ती महिला प्रथमदर्शी मानसिक रुग्ण …

Read More »

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उद्या कौतुक सोहळा

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील यंदाच्या दहावी व बारावी परीक्षेत 90 टक्के गुण घेतलेल्या 122 गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा रविवार दि. 4 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. रेल्वे ओव्हर ब्रिजजवळील मराठा मंदिर येथे सकाळी 10.30 वा. होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे या नात्याने शिवाजी विद्यापीठाचे …

Read More »

भाजप-धजद पदयात्रेला परवानगी : जी परमेश्वर

  राज्यपालांच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढा बंगळूर : मुख्यत: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात गाजत असलेल्या मुडा घोटाळ्याशी संबंधित लढा अधिक तीव्र करण्यासाठी विरोधी पक्ष भाजप आणि धजद आज (ता. ३) बंगळूर-म्हैसूर पदयात्रेला सुरवात करणार आहेत. दरम्यान, पदयात्रेला सरकारने परवानगी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी शुक्रवारी सांगितले. आज बंगळुरमध्ये …

Read More »

मुडा घोटाळा : सरकार विरुध्द राजभवन संघर्ष पेटण्याची शक्यता

  नोटीसला घाबरत नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा बंगळूर : राज्यपालांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मुडा घोटाळा प्रकरणी नोटीस बजावली असून उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील काँग्रेस सरकार आणि राजभवन यांच्यात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घडामोडींदरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही राज्यपालांच्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिल्याने आगामी काळात हा प्रकार …

Read More »

संत मीरा शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून संत मीरा शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव तर अध्यक्षस्थानी किशोर काकडे उपस्थित होते. प्रारंभी …

Read More »

बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

  बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार राजू सेठ यांनी पावसाने नुकसान झालेल्या भागाला भेट देऊन पाहणी केली. बेळगाव शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. आ. राजू सेठ यांनी , बेळगाव उत्तर मतदारसंघातील बसवन कुडची, बीके कंग्राळी, कॅम्प परिसरासह अनेक भागांचा दौरा करून पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पावसामुळे पूर्णत: नुकसान …

Read More »

विजयकांत डेअरीतर्फे ‘किंग आईस्क्रीम’

  बेळगाव : बेळगावात सुरू झालेल्या आणि राज्यभर घराघरात नावारूपाला आलेल्या विजयकांत डेअरीने आता ग्राहकांसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून आपल्या ग्राहकांसाठी नवीन ‘किंग आईस्क्रीम’ बाजारपेठेत दाखल केले असून नवीन किंग आईस्क्रीमचे उत्पादन बाजारात दाखल करण्यात आले आहे. विजयकांत डेअरीच्या आईस्क्रीमचे नवीन उत्पादन आज एका सोहळ्याच्या माध्यमातून दाखल करण्यात …

Read More »