Wednesday , April 22 2026
Breaking News

विजयकांत डेअरीतर्फे ‘किंग आईस्क्रीम’

Spread the love

 

बेळगाव : बेळगावात सुरू झालेल्या आणि राज्यभर घराघरात नावारूपाला आलेल्या विजयकांत डेअरीने आता ग्राहकांसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून आपल्या ग्राहकांसाठी नवीन ‘किंग आईस्क्रीम’ बाजारपेठेत दाखल केले असून नवीन किंग आईस्क्रीमचे उत्पादन बाजारात दाखल करण्यात आले आहे.

विजयकांत डेअरीच्या आईस्क्रीमचे नवीन उत्पादन आज एका सोहळ्याच्या माध्यमातून दाखल करण्यात आले आहे. खासदार जगदीश शेट्टर, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, उद्योजक विजय संकेश्वर, जयकांत सिदनाळ यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन उत्पादनाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी बोलताना महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, व्यवसाय वाढण्यासाठी शिस्त, निष्ठा, चिकाटी आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे. विजय संकेश्वर यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंग आईस्क्रीमही लोकप्रिय होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

खासदार जगदीश शेट्टर यांनी शिवकांत सिदनाळ यांची ध्येयपूर्ती करण्यासाठी तसेच त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मुलांनी दूरदृष्टी लक्षात ठेवली. व्हीआरएलने ज्याप्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे, त्याचप्रमाणे किंग आईस्क्रीमनेही बेळगावची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावी, अशा शुभेच्छा विजयासंकेश्वर यांनी दिल्या.

यावेळी विजय संकेश्वर यांनी शशिकांत सिदनाळ यांच्या कार्याची आठवण करून देत विजयकांत डेअरीला इतक्या दिवसांपासून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून किंग आईस्क्रीमलाही दाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात 4 ते 5 प्रकारची आईस्क्रीम ग्राहकांसाठी बाजारपेठेत सादर करण्यात आली असून येत्या काही दिवसांत सुमारे 50 विविध प्रकारची आईस्क्रीम ग्राहकांना उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जयकांत सिदनाळ बोलताना म्हणाले, 2008 मध्ये विजयकांत डेअरीने आईस्क्रीमच्या माध्यमातून 5 राज्यांमध्ये ग्राहकांची प्रशंसा मिळवली. वडिलांनी बाजारपेठेत आणलेली उत्पादने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा विश्वास असून वितरकांचाही आपल्या यशात मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले.

तब्येत बरी नसतानाही वडील शिवकांत सिदनाळ यांनी प्रयत्न सोडले नाहीत. माझा भाऊ जयकांत सिदनाळ आणि मी विजयकांत डेअरीचे नवीन किंग आईस्क्रीम लाँच करून त्यांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या या प्रयत्नाला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन शिवकांत सिदनाळ यांच्या कन्येने केले.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *