Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

सीए परीक्षेत उत्तीर्ण माजी विद्यार्थ्यांचा मराठी विद्यानिकेतनमध्ये सत्कार

  बेळगाव : 2024 या वर्षातील सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेले मराठी विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी पवन मारीहाळ, ओमकार सुतार व स्वप्नील पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर उपस्थित होते. व्यासपीठावर शाळेचे माजी विद्यार्थी व प्रमुख पाहुणे आय आर …

Read More »

शोकांतिका! एका महिलेला उपचारासाठी चक्क तिरडीवरून आणले!

  खानापूर : एकीकडे देश तंत्रज्ञानात विकसित होत चंद्रावर पोचला असला तरी गावे मूलभूत सुविधांपासून अद्याप वंचित आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे लोटली तरी देखील ग्रामीण भागातील अनेक गावे शासनाच्या सोयीसुविधांपासून वंचित आहेत. याचा प्रत्यय नुकताच खानापूर तालुक्यातील आमगाव गावात आला असून गावातील एका महिलेला उपचारासाठी चक्क तिरडीवरून 4 …

Read More »

यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा तडकाफडकी राजीनामा

  नवी दिल्ली : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या यूपीएससी परीक्षेतील गैरव्यवहाराची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू असतानाच आता केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिला आहे. मनोज सोनी यांचा कार्यकाळ २०२९ पर्यंत होता. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा …

Read More »

जांबोटी – चोर्ला मार्गावर वाहतूक कोंडी; वाहतूक मार्गात बदल

  खानापूर : पश्चिम घाटात सतत पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातही पावसाचा जोर कायम आहे. नद्या दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूल जीर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक मार्ग बदलण्यात आला आहे. बेळगाव शहरातून जांबोटी- चोर्ला मार्गे गोव्याकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांनी पिरनवाडी क्रॉसजवळ डावीकडून वळण घेऊन …

Read More »

वाल्मिकी महामंडळ घोटाळा; सरकार ८५ कोटी रुपये वसूल करणार : सिद्धरामय्या

  भाजपच्या भ्रष्टाचारावर टीका बंगळूर : सरकार एसटी विकास महामंडळात लुबाडलेले ८५.२५ कोटी रुपये वसूल करण्याच्या प्रक्रियेत आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी भाजपच्या भ्रष्टाचारावर टीका करताना आणि भगवा पक्ष सत्तेवर असताना २१ घोटाळे सूचीबद्ध केले. महर्षी वाल्मिकी विकास महामंडळमधील घोटाळ्यावर विधानसभेत झालेल्या चर्चेला सिद्धरामय्या उत्तर देत होते, ज्यांच्या भाषणात …

Read More »

सौंदत्तीजवळ दुचाकींचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

  उगारगोळ : हिरेकुंबीजवळ शुक्रवारी सायंकाळी दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. बसवराज प्रभुनावर (वय 48, रा. सौंदत्ती), यल्लाप्पा कोरविनकोप्प (46, रा. हंचिनाळ) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रामदुर्गचे डीवायएसपी पांडुरंगय्या आणि सौंदत्तीचे सीपीआय डी. एस. …

Read More »

विधानसभेत गदारोळ, धरणे आंदोलन सुरूच

  गोंधळातच विधेयके सादर बंगळूर : महर्षी वाल्मिकी विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा आणि सीबीआय चौकशीची मागणी करत भाजपने विधानसभेत धरणे धरल्याने कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. कांही वेळ सभागृहाचे कामकाजही तहकूब करावे लागले. आज सकाळी सभागृहाचे सत्र सुरू असताना, भाजप आणि धजदचे आमदार सभापतींच्या खुर्चीशेजारी असलेल्या वेलमध्ये …

Read More »

तलाठ्याच्या गाडीत सापडले १ कोटी दहा लाख रुपये..

  बेळगाव : एक तलाठी आपल्या कारमध्ये 1 कोटी 10 लाख रुपये घेऊन जात असताना पोलिसांनी छापा टाकून कागदोपत्री नोंद नसलेली रक्कम जप्त केली. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हलगट्टी चेकपोस्टजवळ पोलिसांनी ग्राम लेखापालाची गाडी अडवली असता त्यांना तलाठ्याच्या गाडीत रुपये सापडले व ते जप्त केले. निपाणी तालुक्यातील ग्राम लेखापाल असलेल्या …

Read More »

नियती फौंडेशनच्या वतीने उद्या खानापूरात डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीर

  खानापूर : नियती फौंडेशन आणि श्री गुरुदेव फौंडेशन यांच्या वतीने उद्या दिनांक 20 जुलै रोजी डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे सर्वत्र डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या आजाराने थैमान घातले आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियती फौंडेशनतर्फे सदर लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. उद्या …

Read More »

शट्टिहळ्ळी – मरणहोळ पूल पाण्याखाली

  दड्डी : शट्टिहळ्ळी ता. हुक्केरी येथील घटप्रभा नदीला पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तालुक्यातील पावसाची संततधार वाढली असून शट्टिहळ्ळी -मरणहोळ पूल दिवसभराच्या पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. आज दिवसभर जोरात पडत आसलेल्या या पावसामुळे बंधाऱ्यावर पाणी आले असून बंधारा पाण्याखाली गेला आहे. गेल्या 15 दिवसापासुन मोदगा बंधारा पाण्याखाली गेला आहे. …

Read More »