Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

तिसरे गेट उड्डाणपूल रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पोलीस सरसावले

  बेळगाव (प्रतिनिधी) : तिसरे रेल्वे गेट उड्डाणपूलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. यासाठी नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन देखील छेडण्यात आले. त्यावेळी सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आश्वासन देण्यात आले होते. सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा या रस्त्याची अवस्था गंभीर …

Read More »

आमगावकरांच्या पाठीशी खानापूर ब्लॉक काँग्रेस; स्थलांतरासंदर्भात ग्रामस्थांशी केली सविस्तर चर्चा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या सुचनेनुसार खानापूर ब्लॉक काँग्रेसचे शिष्टमंडळ आज आमगाव येथे भेट देऊन स्थलांतर विषयावर ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. सध्या जंगलभागातील गावांच्या स्थलांतराचा विषय ऐरणीवर आला असून, त्यात आमगाव गावाचा विषय घाईगडबडीत पुढे नेला जात असल्याची चर्चा आहे. …

Read More »

18 वर्षीय युवकाचा मलप्रभा नदीपात्रात बुडून मृत्यू

  खानापूर : मलप्रभा नदीत पोहायला गेलेल्या एका 18 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. प्रथमेश रवींद्र पाटील (राहणार: लोकोळी) असे नदी पात्रात बुडून मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या रवींद्रचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते. मात्र, …

Read More »

राहूल गांधी नोव्हेंबरमघ्ये राज्याच्या दौऱ्यावर; नेतृत्व बदलाच्या पार्श्वभूमीवर राजकीय औत्सुक्य

  बंगळूर : प्रदेश काँग्रेसमध्ये सत्तावाटप आणि उत्तराधिकाराच्या चर्चा जोरात सुरू असताना, बिहार निवडणुकीनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या राज्य दौऱ्यामुळे नोव्हेंबर क्रांतीची पूर्वसंध्या असेल का, अशी चर्चा सुरू झाली आहे. नोव्हेंबर क्रांतीपूर्वी राज्य काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत. सतीश जारकीहोळी हे सिद्धरामय्या यांचे उत्तराधिकारी आहेत या यतींद्र …

Read More »

विजेचा धक्का लागून कंग्राळी खुर्दच्या तरुणाचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बंबरगे गावात पावसादरम्यान विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अमोल विवेकानंद उर्फ लालू जाधव (वय ४३ रा.रामनगर, कंग्राळी खुर्द) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, अमोल जाधव यांचे बंबरगे येथे कुक्कुटपालन केंद्र आहे. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीची बैठक रविवारी

  खानापूर : एक नोव्हेंबर काळ्या दिना निमित्त खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आलेली आहे. १ नोव्हेंबर काळादिन संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे, तरी या बैठकीला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या …

Read More »

शहर म. ए. समितीची बैठक रविवारी

  बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक रविवार दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5.30 मिनिटांनी रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अध्यक्ष श्री. दीपक …

Read More »

१ नोव्हेंबर २०२३ काळा दिनप्रकरणी दाखल गुन्ह्यात कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

बेळगाव : 1 नोव्हेंबर 2023 रोजी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला होता. आणि मूक सायकल फेरीचे आयोजन केले होते. त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा आणि कर्नाटक विरोधी घोषणा देणे, भाषिक तेढ निर्माण करण्याचा ठपका ठेवून कार्यकर्त्यांवर भारतीय दंड सहित कलम 142, ,147,153,290 सह कलम 149 प्रमाणे त्यांच्या …

Read More »

प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला भीषण आग, २० प्रवासी जिवंत जळाले

  कुर्नूल : आंध्र प्रदेशच्या कुरनूरमध्ये शुक्रवारी पहाटे भरधाव बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमध्ये २० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या बसमधून ४० प्रवासी प्रवास करत होते. बसला आग लागल्यानंतर काही प्रवाशांनी बसमधून बाहेर उड्या मारल्या त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. घटनास्थळावर पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने …

Read More »

मतदार अनियमितता प्रकरण : बनावट मतदार हटवण्यासाठी प्रत्येकी ८० रुपयांचा व्यवहार; भाजप नेते गुत्तेदार यांच्या मालमत्तांवर एसआयटीचे छापे

  बंगळूर : बनावट मतदार हटवण्यासाठी एका डेटा सेंटर ऑपरेटरला प्रत्येकी ८० रुपये देण्यात येत होते, असे आळंद विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील कथित अनियमिततेची चौकशी करणाऱ्या कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) आढळून आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर केलेल्या “मत चोरी”च्या आरोपात या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. …

Read More »