Sunday , July 26 2026
Breaking News

तिसरे गेट उड्डाणपूल रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पोलीस सरसावले

Spread the love

 

बेळगाव (प्रतिनिधी) : तिसरे रेल्वे गेट उड्डाणपूलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. यासाठी नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन देखील छेडण्यात आले. त्यावेळी सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आश्वासन देण्यात आले होते. सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा या रस्त्याची अवस्था गंभीर बनली आहे. याची दखल घेऊन आता रहदारी पोलीस यंत्रणाच या दुरुस्तीसाठी पुढे सरसावली आहे. याचे काम शुक्रवारी करण्यात आले. रहदारी पोलीस विभागाचे एसीपी ज्योतिबा निकम यांच्या पुढाकाराने ही दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली होती.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *