Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

सौदी अरेबियात उष्माघाताने हज यात्रेतील एक हजार भाविकांचा मृत्यू

  सौदी अरेबियातील मक्का येथे हज यात्रा सध्या सुरू आहे. या यात्रेमध्ये तब्बल १००० भाविकांना तीव्र उष्णतेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या सौदी अरबसह मध्य पूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली आहे. या उष्णतेच्या लाटेचा हज यात्रेवरही गंभीर परिणाम झाला आहे. बुधवारी तब्बल ५५० हज यात्रेकरुंचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती …

Read More »

एकल पालक मुलांसाठी शैक्षणिक साहित्याचे वितरण आणि समुपदेशन कार्यक्रम

  बेळगाव : भरतेश कॉलेज ऑफ कॉमर्सच्या सभागृहात कोविडमुळे एकल पालक आणि दिवा गमावलेल्या मुलांना शाळेच्या दप्तर, नोटबुक, भूमिती बॉक्स, पेन आणि पेन्सिलचे वाटप Accelerate India Foundation Trust आणि Suprajit Foundation बंगलोर यांनी केले. इयत्ता पहिली ते पदव्युत्तर वर्गातील ७० हून अधिक मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाला Accelerate …

Read More »

निपाणीतील युवकाचा ‘गाभ’ चित्रपट उद्या प्रदर्शित

  निपाणीच्या सांस्कृतिक शिरपेचात मानाचा तुरा; आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणलेला चित्रपट निपाणी (वार्ता) : येथील लेखक, दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांचा पहिला पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट ‘गाभ’ हा शुक्रवारी (ता.२१) सर्वत्र प्रदर्शित होत आहे. शासनाच्या वतीने कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृतरित्या निवडला गेलेला हा चित्रपट असून तेथे याचा जागतिक प्रिमिअर सुद्धा झाला …

Read More »

सिदनाळ सन्मती विद्यामंदिरमध्ये पूर्व प्राथमिक शाळेचे उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ सन्मती विद्यामंदिरमध्ये कन्नड व मराठी एलकेजी युकेजी‌‌, पूर्व प्राथमिक शाळेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी आर. पी. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून स्तवनिधी पी. बी. आश्रमचे संचालक महावीर पाटील, सन्मती विद्यामंदिरचे उपाध्यक्ष नेमिनाथ मगदूम, स्तवनिधीचे संचालक प्रदीप पाटील, सन्मतीचे संचालक राजू …

Read More »

सौरमित्र योजनेमधून शेतकऱ्यांना न्याय द्या

  राजू पोवार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : सौमित्रच्या वेबसाइटवर सौर शेती पंपांसाठी अनुदानित रकमेवर शेतकऱ्यांना सौर पंपसेट वितरित केले जात आहेत. सौमित्र यांच्या संकेतस्थळावर निपाणी विभागातील सदलगा येथे १४ गावांचा समावेश आहे. या गावांचे फॉर्म न भरल्याने सर्व्हे नंबरमधील हिस्सा नंबर ओपन होत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे …

Read More »

“युगांत”मधील भीष्म या विषयावर माधव कुंटे यांचे साभिनय सादरीकरण

  बेळगाव : येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांची पितामह भीष्म यांच्या जीवनावरील कादंबरी “युगांत” बरीच गाजली. तिचा हिंदी अनुवाद डॉ. प्रतिभा मुदलीयार, हिंदी विभाग प्रमुख, म्हैसूर विद्यापीठ मैसूर यांनी अलीकडेच केला आहे. या कादंबरीतील प्रमुख व्यक्तिरेखा असलेल्या पितामह भीष्मांचे साभिनय सादरीकरण माधव कुंटे हे करून देणार आहेत. माधव …

Read More »

विधान परिषद निवडणुकीच्या स्थगितीसाठी ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार

  मुंबई : विधानसभेतून निवडून द्यायच्या विधान परिषदेतील ११ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला. त्यानुसार २५ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून १२ जुलै रोजी मतदान व त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होईल. या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. मात्र, यानिवडणुकीआधीच …

Read More »

हत्या प्रकरणातील नाव लपविण्यासाठी दिले ३० लाख रुपये; अभिनेता दर्शनने दिले स्वेच्छेने निवेदन

  बंगळूर : रेणुकास्वामीच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आपले नाव लपवण्यासाठी ३० लाख रुपये दिले होते, असे दुसरा आरोपी अभिनेता दर्शन याने पोलिसांसमोर स्वेच्छेने निवेदन दिले आहे. पोलिस चौकशीत अभिनेता दर्शन उर्फ ​​डी बॉसने स्वेच्छेने जबाब नोंदवला असून खून झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मी ३० लाख रुपये दिले होते आणि …

Read More »

ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. अशोक साठे यांचे निधन

  बेळगाव : जुन्या पिढीतील सुप्रसिद्ध डॉक्टर तसेच बेळगाव येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. अशोक साठे यांचे दिनांक २० रोजी पुणे येथे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. एक सुस्वभावी, सहृदयी डॉक्टर तसेच कलासक्त नाट्यकर्मी अशी त्यांची ओळख होती. कडोलकर गल्ली येथील त्यांच्या दवाखान्यामधून त्यांनी बेळगावकरांची दीर्घकाळ वैद्यकीय सेवा केली होती. …

Read More »

एचएसआरपी नंबर प्लेटसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ

  बंगळूर : राज्य सरकारने एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट्स (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. अनेक मुदती असूनही, बहुतांश वाहनमालकांनी अद्याप एचएसआरपी नंबर प्लेट लावलेल्या नाहीत. यापूर्वी १२ जून संपल्यानंतर ती ४ जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. आता महत्त्वाची बैठक झाली असून १५ सप्टेंबरपर्यंत …

Read More »