Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

मुख्यमंत्र्यांच्या स्वतंत्र बैठकांनी वाढवली राजकीय उत्सुकता

  बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल रात्री आपल्या जवळच्या मंत्र्यांसोबत घेतलेल्या स्वतंत्र बैठकीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. “नोव्हेंबर क्रांती”च्या कुजबुजदरम्यान या बैठकींनी उत्सुकता निर्माण केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, एच.सी. महादेवप्पा आणि सतीश जारकीहोळी यांनी स्वतंत्र बैठक घेतली होती. त्यांच्या खात्यांमध्ये हस्तक्षेप वाढल्याचा …

Read More »

ऑनलाइन बेटिंग घोटाळ्यात आमदार वीरेंद्र पप्पी अडचणीत; ईडीकडून ५० कोटींचे सोने जप्त

  बंगळूर : चित्रदुर्गचे काँग्रेस आमदार वीरेंद्र पप्पी यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणाच्या तपासादरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या चळ्ळकेरे येथील घरावर आणि फेडरल बँकेतील दोन लॉकरवर छापा टाकून तब्बल ५०.३३ कोटी रुपयांचे ४० ईडीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या छाप्यांपूर्वीही १०३ कोटी रुपयांची …

Read More »

जिल्हा बँकेसाठी निपाणी तालुक्यात वर्चस्वाची लढाई

  जोल्ले, पाटील यांच्यामुळे वाढली चुरस ; राजकीय गोटात चर्चेला उधाण निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातून बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी सत्ताधारी गटाकडून माजी खासदार विद्यमान संचालक आण्णासाहेब जोल्ले आणि सहकाररत्न उत्तम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीनंतर पुन्हा पाटील आणि जोल्ले यांनी …

Read More »

“हाय स्ट्रीट”चे नामांतर “छत्रपती शिवाजी महाराज मार्ग”

  बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने भारतीय वीर आणि शहिदांना सन्मानित करण्याचा उपक्रम हाती घेतला असून कॅन्टोन्मेंट बोर्डातील 34 ब्रिटिशकालीन रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅम्प परिसरात असलेल्या “हाय स्ट्रीट” या रस्त्याचे नाव बदलून थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या रस्त्याचे नामकरण करण्यात आले असून तसा फलक देखील …

Read More »

सर्वोच्च न्यायालयातील घटनेचा बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने निषेध

  बेळगाव : नवी दिल्ली येथे 6 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीशांच्या खंडपीठांसमोरील सुनावणी दरम्यान एका वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याची निंदनीय घटना घडली होती. त्या घटनेचा निषेध करत या प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनतर्फे राष्ट्रपतींकडे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत गुरुवारी केली आहे. राष्ट्रपतींच्या नावे असलेल्या मागणीचे …

Read More »

यंदा ऊसाची कमतरता असल्याने तोडणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये : स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी

  बोरगांव येथील सभेत शेतकऱ्यांना आवाहन निपाणी (वार्ता) : जागतिक बाजारपेठेत साखर आणि इथेनॉलला मागणी जास्त आहे. उसापासून वीज व गॅस तया होत आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला अगोदर दिला जात नाही.ऊस वाहतूक, ऊस तोडणी कामगार, कारखानदार, पतसंस्था असे सर्व घटक शेतकऱ्यांना लुटत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी जागृती आले पाहिजे. …

Read More »

भूतरामनहट्टी प्राणी संग्रहालयात लवकरच ‘अक्का कॅफे’

  बेळगाव : बेळगाव येथील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी झू येथे “अक्का कॅफे” सुरू करण्याच्या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उप वनसंरक्षक, बेळगाव विभाग, क्रांती एन.ई. यांच्या उपस्थितीत आज जिल्हा पंचायत सभागृहात बैठक पार पडली. सदर बैठकीत के.आर.आय.डी.एल. विभागामार्फत अक्का कॅफेच्या इमारतीच्या रचनेचा आराखडा …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थी शिक्षकांची मुख्य टपाल कार्यालयाला भेट

  बेळगाव : आज राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगांव येथील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या मार्गदर्शनानुसार कॅम्प बेळगांव येथील मुख्य टपाल कार्यालयाला शैक्षणिक भेट दिली. या भेटीच्या वेळी पोस्टमास्टर लक्ष्मण चावडीमनी सर तसेच श्रीनिवास सर, दोडमणी सर या टपाल खात्याच्या …

Read More »

प्रति टन ४००० हजार रुपये दर घोषित केल्याशिवाय कारखाने सुरू करू नका

  रयत संघटनेचे हारूगेरी क्रॉसवर यल्गार आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : केंद्र सरकारने निश्चित केलेली यंदाच्या हंगामातील उसाची एफआरपी किंमत ही शेतकऱ्यांची पूर्णपणे फसवणूक करणारी आहे. साखर कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास सहमत नाहीत. या एफआरपीशिवाय किंमत निश्चित करून शेतकऱ्यांना पहिला हप्ता ४००० रुपये प्रति टन या दराने देण्यात यावा. …

Read More »

सद्गुरु पंत महाराज पुण्यतिथी भक्तीभावाने सांगता

  बेळगाव : कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंत बाळेकुंद्रीतील पंत महाराजांच्या १२० व्या पुण्यतिथी समारंभात महाप्रसादाने आणि पंत महाराजांच्या श्री पालखीने सोहळ्याची सांगता मोठा उत्साहात झाली. हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शुक्रवारी दुपारी बारा वाजता पंत महाराजांचे वंशज रंजन पंत-बाळेकुंद्री यांच्या हस्ते महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार …

Read More »