Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

सिमीवर पाच वर्षांची बंदी वाढवली, गृह मंत्रालयाने जारी केला आदेश

  नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) वरील बंदी पाच वर्षांसाठी वाढवली आहे. गृह मंत्रालयाने सोमवारी २९ जानेवारी रोजी एक्सवर एका पोस्टद्वारे ही बंदी वाढवण्याच्या आदेशाची माहिती शेअर केली आहे. गृह मंत्रालयाने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या दृष्टिकोनानुसार, …

Read More »

दुसऱ्या कसोटीतून रवींद्र जाडेजा अन् केएल राहुल संघाबाहेर, सरफराज खानसह तिघांना संधी

  मुंबई : हैदराबाद कसोटीमध्ये भारतीय संघाचा 28 धावांनी पराभव झाला होता. आता दुसऱ्या सामन्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल या अनुभवी खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. हैदराबाद कसोटी सामन्यावेळी दोघांनाही दुखापत झाली होती. बीसीसीआयने तीन खेळाडूंना चमूमध्ये संधी दिली आहे. सरफराज खान याला …

Read More »

भाजपतर्फे बेळगावात राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन

  बेळगाव : केरेगोडू गावात रामभक्तांनी फडकवलेला अंजनेय ध्वज राज्य सरकारने काढून टाकला आणि त्याच ठिकाणी पोलिसांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाचा अवमान केला, असा आरोप राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी केला. बेळगावजवळील एमके हुबळी आणि मंड्या जिल्ह्यातील केरेगोडू गावात भगवे ध्वज आणि श्रीरामाचे पोस्टर काढून टाकल्याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हा भारतीय जनता …

Read More »

भेदभाव न करता विकास कामे करणार

  माजी आमदार काकासाहेब पाटील : हजरत राजेबागस्वार दर्गा विकास कामास प्रारंभ निपाणी (वार्ता) : राज्य सरकारच्या वक्फ खात्याकडून जत्राट येथील श्रध्दास्थान हजरत राजेबागस्वार दर्गा विकासासाठी ११ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५ लाख रुपये सुपूर्द करण्यात आले असून उर्वरित निधी लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती …

Read More »

निपाणीत वळूंच्या दहशतीमुळे नागरिक भितीच्या छायेखाली

  निपाणी (वार्ता) : शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील नेहरू चौकात झालेल्या दोन वळुंच्या झुंजीत दुकान व वाहनांचे नुकसान झाले आहे. वर्षापूर्वी याच ठिकाणी झुंज लागून नागरीक जखमी झाले होते. याशिवाय कोठीवले कॉर्नरजवळ थांबलेल्या महिलेस वळूने धक्का मारल्याची घटना घडली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने या गंभीर घटनेकडे …

Read More »

भारतीय संविधान सामाजिक समतेचे प्रतीक : प्रा. सुरेश कांबळे

  गव्हाण येथे डॉ. आंबेडकर युवा संघाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : भारतीय समाजात हजारो जाती, धर्म, पंथ, भाषा अशा प्रस्थापित व्यवस्थेमध्ये केवळ एक वर्ग सोडून शेतकरी, कामगार, शोषित, वंचित, पीडित व स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे स्वविचाराचे अधिकार प्राप्त झाले नव्हते. अशा प्रवृत्तीमुळे एकाधिकारशाही निर्माण होऊन भारतीय समाज व्यवस्थेमध्ये मानवी मूल्य पायदळी …

Read More »

कॅपिटल वन 12 वी एकांकिका स्पर्धा 3 व 4 फेब्रुवारीला

  बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेतर्फे सलग बाराव्या वर्षी भव्य एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. कर्नाटक महाराष्ट्र, गोवा या तिन्ही राज्यामधील संघांचे अभासी तत्वावर निवड झालेल्या दिग्गज संघांचा समावेश या आंतरराज्य स्पर्धेमध्ये होणार असून, स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्सहन देण्यासाठी बेळगांव जिल्हा मर्यादित शालेय गटामध्ये देखील स्पर्धा भरविण्यात येणार …

Read More »

कर्नाटकात हनुमान ध्वज हटवण्यावरुन पेटला वाद, सिद्धरामय्या सरकारविरोधात भाजपा आक्रमक

  मांड्या : कर्नाटकातल्या मांड्या जिल्ह्यातल्या केरागोडू गावात हनुमान ध्वज उतरवण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. १०८ फूट उंच स्तंभावरुन हनुमान ध्वज हटवण्यात आल्याने वाद पेटला आहे. या वादाने राजकीय वळण घेतलं आहे. भाजपा नेते, कार्यकर्ते विरुद्ध कर्नाटक सरकार असा वाद पेटला आहे. त्यामुळे या गावात कलम १४४ लागू करण्यात आलं …

Read More »

सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्यांपैकी दोघांचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव बसवन गल्ली येथे रविवारी सायंकाळी झालेल्या सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्यांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उडुपी येथील कामाक्षी भट्ट आणि हेमंत भट्ट अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत. अन्य दोघांची प्रकृती गंभीर असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. बसवन गल्ली येथे रविवारी सायंकाळी एका घरात …

Read More »

महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर यांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे पत्र

  बेळगाव : मुंबई वाशी येथे दुसरे विश्व मराठी संमेलन सुरू आहे. मराठी भाषा संवर्धनाबाबत संमेलनात काही निर्णय घेण्यात येतील आणि त्याचा उपयोग मराठी भाषिकांना होईल यात संशय नाही. संमेलनास महाराष्ट्र -कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सीमाभागातील मराठी जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी गेली 67 वर्षे लढा देत …

Read More »