Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य : विशाल सुर्वे

  बेळगाव : ‘पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना बालपणीच कमीत कमी विजेचा वापर कसा करावा, पाण्याची बचत कशी करावी आणि प्लास्टिकचा वापर कसा टाळावा याचे मार्गदर्शन केले तरच आपल्या धरणीमातेचे रक्षण होईल आणि धरणीमाता स्वच्छ व हिरवीगार होईल, न होऊन येत्या दहावीस वर्षात मोठ्या समस्येला …

Read More »

खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी गावात चोरी

  गरिबांच्या बचतीवर चोरांचा डल्ला खानापूर : चन्नेवाडी ता. खानापूर येथे आज दिवसाढवळ्या चोरट्यानी आपला मोर्चा वळवला व तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पळवला. नारायण लक्ष्मण सुतार यांच्या घरातील परसुतून चोरट्यानी आत प्रवेश केला व सामानाची नासधूस केली. ट्रांक पेटीतील रोख रक्कम व चांदीची जोडवी चोरली, आज चन्नेवाडी गावात एका वृद्धेचे …

Read More »

“ऑलिम्पिक असोसिएशनची समिती आणि माझं निलंबन अमान्य”, संजय सिंह यांनी क्रीडा मंत्रालयाविरोधात दंड थोपटले

  नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघावरून मोठं घमासान चालू आहे. क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाची नवी कार्यकारिणी नुकतीच बरखास्त केली. तसेच निवडणूक जिंकून कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झालेल्या सजय सिंह यांना निलंबित केलं आहे. दरम्यान, संजय सिंह यांनी भारतीय ऑलिम्पिक संघाविरोधात दंड थोपटले आहे. संजय सिंह म्हणाले, “भारतीय ऑलिम्पिक संघाने नेमलेली …

Read More »

अयोध्येतल्या राम मंदिरातील रामाची मूर्ती साकारणारे मूर्तीकार अरुण योगीराज कोण आहेत?

  बेंगळुरू : अयोध्येतल्या राम मंदिरात २२ जानेवारी या दिवशी रामाची मूर्ती स्थापन करुन प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. रामलल्लाची म्हणजेच बाल रुपातील रामाची मूर्ती मंदिरात असणार आहेच. याशिवाय राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचीही मूर्ती मंदिरात असणार आहे. प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारलेली मूर्ती या मंदिरातल्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करुन …

Read More »

प्रेम प्रकरणावरून नावगे गावात दोन गटात हाणामारी

  बेळगाव : एका मुलीसाठी दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना नावगे गावात घडली. प्रेमप्रकरणावरून दोन गटात वाद झाला. हे प्रकरण इतके वाढले की, वादाने हिंसक रूप धारण केले. या घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रेमप्रकरणातून तरुणांमध्ये झालेल्या वादावादीत पंचाच्या घरावर मध्यरात्री दगडफेक करून घर, कार, …

Read More »

मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा कट : डी. के. शिवकुमार

  बंगळूर : आपणास राजकीयदृष्ट्या संपवण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला. बेकायदेशीर मिळकत प्रकरणात सीबीआयने त्यांना नोटीस बजावल्याबद्दल शहरातील पत्रकारांना उत्तर देताना, उपमुख्यमंत्री म्हणाले, की राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीची परवानगी मागे घेतल्यानंतरही ही नोटीस बजावण्यात आली आहे. माझा छळ करून मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचे …

Read More »

सीमावासीयांना सुद्धा वैद्यकीय सहायता निधीचे कवच!

  बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वैद्यकीय मदत कक्ष उभा केला आहे. त्यातून महाराष्ट्रातील असंख्य लोकांना वैद्यकीय सुविधा मिळाल्या आहेत. आजपर्यंत सुमारे दीडशे कोटी रुपयांचा निधी या वैद्यकीय मदत कक्षाद्वारे वाटप करण्यात आला आहे. हीच वैद्यकीय सेवा सीमाभागातील लोकांसाठी लागू करण्यात आली होती. मात्र त्यासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता …

Read More »

शिवकुमार दाम्पत्यासह ३० जणांना सीबीआयची नोटीस

  ११ जानेवारीला कागदपत्रांसह हजर राहण्याची सूचना बंगळूर : सीबीआयने उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना नोटीस बजावून केरळस्थित जयहिंद वाहिनीमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा तपशील देण्यास सांगितले आहे. कालच जयहिंद वाहिनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एस. शिजू यांना नोटीस बजावल्यानंतर सीबीआयने आता शिवकुमार आणि त्यांची पत्नी उषा शिवकुमार यांच्यासह एकूण ३० जणांना ११ …

Read More »

परराज्यातील “गाजर” बेळगाव ब्रॅण्डच्या नावाखाली विकणाऱ्या दलालाचा पर्दाफाश!

  बेळगाव : बेळगावचा शेतकरी कधी अस्मानी संकटांशी तर कधी सुलतानी संकटांशी झुंजत आहे. त्यात भरीस भर म्हणून की काय दलालांनी परराज्यातील भाजीपाला, कडधान्ये आणून बेळगाव ब्रँडच्या नावाखाली बाजारपेठेत विकू पहात आहेत. त्याचेच प्रत्यय आज झाडशहापूर येथील शेतकऱ्यांना आले. बेळगावचे मसूर, बासमती तांदूळ व इतर कडधान्ये जगप्रसिद्ध आहेत. स्थानिक बाजारपेठेत …

Read More »

मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर आम्ही अयोध्येला नक्की जाऊ : मनोज जरांगे

  जालना : मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला नक्की जाऊ. आम्ही रस्त्यानं चालताना २२ तारखेला राम मंदिराचा आनंद साजरा करू, असं मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. ते अंतरवाली सरातीत पत्रकारांशी बोलत होते. शंभुराजे देसाई यांनी मला पत्र पाठवून उद्या मुंबईत होणाऱ्या आरक्षणांबाबतच्या बैठकांना बोलावलंय पण मी या बैठकाीला …

Read More »