Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

बोरगांव ‘जयगणेश’ची निवडणूक बिनविरोध अध्यक्षपदी अभय मगदूम तर उपाध्यक्ष म्हणून सचिन रोड्ड

  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील जय गणेश मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा संस्थेचे संस्थापक अभय मगदूम तर उपाध्यक्षपदी सचिन रोड्ड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून एस. पी. पुजारी हे होते. संघाच्या संचालक मंडळ निवडीत चार नव्या चेहऱ्यांना संधी देत …

Read More »

पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने 25 लाखांना ठकवले; 6 जणांच्या टोळीला बेड्या

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील विद्या नगर येथे राहणाऱ्या सिद्धनगौडा बिरादार यांना गेल्या नोव्हेंबरमध्ये पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून 25 लाख रुपये उकळून फसवणूक करून पळून गेलेल्या 6 जणांच्या टोळीला काकती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सिद्धनगौडा हे मंत्री सतीश जारकीहोळी यांचे नातेवाईक आहेत. पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून …

Read More »

पत्रकार राजेंद्र हजारे यांची राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कारासाठी निवड

  कोल्हापूर (वार्ता) : निपाणी येथील पत्रकार राजेंद्र हजारे यांची “आढावा महाराष्ट्राचा, गौरव महाराष्ट्राचा”तर्फे राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र मुख्य संपादक अनिल सुतार यांनी पाठवले आहे. बुधवारी (ता.३) कोल्हापूर येथील दसरा चौकातील शाहू स्मारक सभागृहात दुपारी २ वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पत्रकार राजेंद्र …

Read More »

कर्तृत्व सिद्ध होण्यासाठी स्वप्नावर ठाम रहा

  प्रा. युवराज पाटील; दोशी विद्यालयात पारितोषिक वितरण निपाणी (वार्ता) : आजच्या तरुणांनी केवळ दीड जीबी डेटा संपवणे हे आपले ध्येय न ठेवता, उच्च ध्येय ठेवून कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आपल्या स्वप्नांवर ठाम रहावे. स्वप्न पूर्ण करताना परिस्थिती नव्हे तर मनस्थिती आड येते. जसे बुद्धिबळाच्या प्याद्यामध्ये वजीर होण्याची ताकद असते, तसेच …

Read More »

बैलहोंगल : भीषण अपघातात दोन ठार, चार गंभीर जखमी

  बेळगाव : दोन कारची समोरासमोर धडक होऊन दोन जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. मृत्युमुखी झालेल्यांची नावे मंगला महांतेश भरमनायकर (50, रा. लड्डीगट्टी, बैलहोंगल) आणि चालकाचे नाव श्रीशैला सिद्धनगौड नागनगौडर (40, रा. संपगाव) अशी आहेत. रायनायका भरमनायकर (87), गंगाव्वा रायनायका भरमनायकर (80), मंजुळा श्रीशैल नागनगौडर (30), …

Read More »

‘बोगी हॉटेल’ रविवारपासून सेवेत : शनिवारी संध्याकाळी भव्य उद्घाटन

  बेळगाव : नैऋत्य रेल्वेच्या अखत्यारीतील एक महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखले जाणारे बोगी हॉटेल शनिवार दि. ३० पासून बेळगावकरांच्या सेवेत दाखल होत आहे. नैऋत्य रेल्वेचे चौथे आणि बेळगावातील पहिले चोवीस तास हॉटेल ठरणार आहे. मॅग्नम फूड्स कंपनीच्या माध्यमातून या हॉटेलचा कार्यारंभ होणार आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता भव्य उदघाटन कार्यक्रम …

Read More »

नियोजित वराच्या खून प्रकरणी 7 जण निर्दोष

  बेळगाव : नियोजित वधू व तिच्या प्रियकराने वराचा खून केल्याचा आरोप करत सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्वांची तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश चन्नाप्पा गौडा यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. हणमंत रामाप्पा मरलिंगप्पण्णावर (वय २८), बसव्वा ऊर्फ बसम्मा परमेश्वर तळवार (वय २५), उमेश सन्नगदीगेप्पा बारिगीडद (वय …

Read More »

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाला वेग; विधानसभा अध्यक्षांसमोर जानेवारी महिन्यात होणार सुनावणी

  मुंबई : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणीची तारीख निश्चित होणार आहे. विधानसभा अध्यक्ष एकीकडे शिवसेना आमदार पात्र आणि अपात्र बाबत निकाल तयार करणार आहे. तर लगेच दुसरीकडे राष्ट्रवादी आमदार अपात्राबाबत सुनावणी सुरु करणार आहेत. विधानसभा अध्यक्षांना …

Read More »

“पोलिसांनी वाहनं अडवण्याचा प्रयत्न केला, तर गृहमंत्र्यांच्या…”, मनोज जरांगे-पाटलांचा इशारा

  मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईत करण्यात येणाऱ्या आंदोलनाचा मार्ग आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी गुरूवारी (२८ डिसेंबर) जाहीर केला. २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघणारी पदयात्रा सहा जिल्ह्यांतून जाणार असून, यामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. अशातच मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला …

Read More »

“तरुणांच्या हाती काम नाही त्यामुळे त्यांचे दिवसातले सात ते आठ तास फेसबुक-इंस्टाग्रामवर…”, राहुल गांधींची टीका

  नवी दिल्ली : भारतातल्या युवकांची युवाशक्ती वाया घालवली जाते आहे. भारतात गेल्या ४० वर्षात आली नव्हती इतकी मोठी बेरोजगारी मागच्या दहा वर्षांमध्ये आली आहे. भारतातले तरुण दिवसातले सात ते आठ तास मोबाइलवर फेसबुक आणि इंस्टाग्राम पाहण्यात घालवतो असं वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. राहुल गांधी …

Read More »