Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

खानापूर – हेम्माडगा रस्त्याची पुनर्बांधणी करा! : खानापूर तालुका म. ए. समितीचे तहसिलदारांना निवेदन

  निवेदनाची दखल न घेतल्यास रास्तारोकोचा इशारा खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर – हेम्माडगा रस्त्याची पुनर्बांधणी करण्यासह सदर मार्गावर सुरु असलेल्या अवजड वाहतुकीला निर्बंध आणावेत या मागणीसाठी, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज सोमवार दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी खानापूरच्या तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. तहसिलदारांच्या अनुपस्थितीत उपतहसिलदार कल्लाप्पा कोलकार यांनी निवेदनाची …

Read More »

भाजप आमदार अधिवेशनाचा वेळ वाया घालत आहेत; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची टीका

  मंत्री जमीर अहमद यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक बेळगाव – काँग्रेस पक्ष संविधानानुसार चालणारा पक्ष आहे, याउलट भारतीय जनता पक्ष संविधान आणि संसदीय व्यवस्थेच्या विरोधी आहे. भारतीय जनता पक्ष उत्तर कर्नाटकातील जनतेच्या विरोधात काम करत आहे. हिवाळी अधिवेशनात वेळ वाया घालवण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी चालविले आहे. हा या …

Read More »

प्रथमोचार वैद्यकीय सहाय्यक संघटनेच्या मागण्यांसाठी आंदोलन

  बेळगाव : कर्नाटक राज्य ग्रामीण प्रथमोपचार डॉक्टर संघटनेच्या मागणीसाठी आज बेळगाव येथील सुवर्णसौध परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक राज्य ग्रामीण प्रथमोपचार डॉक्टर्स असोसिएशनचे सचिव आर. आर. पाटील म्हणाले की, आमच्या संस्थेचे सदस्य ग्रामीण भागात आरोग्य, वाहतूक सेवा यासारख्या योग्य पायाभूत सुविधांपासून वंचित असलेल्या ग्रामीण भागात आणि झोपडपट्टीत वैद्यकीय …

Read More »

स्मशान मारुती, शनि मंदिरात दीपोत्सव उत्साहात

  निपाणी (वार्ता) : येथील स्मशान मारुती आणि आदर्श नगरातील शनि मंदिरामध्ये कार्तिक दीपोत्सव पार पडला. स्मशान मारुती मंदिरात श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते समई पूजन करून कार्तिक दीपोत्सव सुरू झाला. यावेळी मंदिर परिसरात भाविकांनी रांगोळ्या रेखाटल्या होत्या. भक्तांनी मंदिर परिसरामधील ठेवलेल्या पणत्या लावून मंदिर परिसर उजळून टाकला. यावेळी भक्तांना …

Read More »

अतिथी शिक्षक भ्रष्टाचाराची चौकशी होणार : डॉ. राजेश बनवन्ना

  निपाणी (वार्ता) : येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचाराचे प्रकार घडत आहेत. आपण अतिथी शिक्षक असून लाच न दिल्याने थकीत वेतन अदा न करता तबस्सुम गणेशवाडी यांना कामावरून कमी करण्यात आल्याची तक्रार अतिथी शिक्षक असलेल्या जावेद गणेशवाडी आणि तबस्सुम गणेशवाडी दाम्पत्यांने केली. तरीही कोणतीच कारवाई होत नसून याप्रश्नी आप पार्टीच्या …

Read More »

कुन्नूर दूधगंगा पीकेपीएसवर उत्तम पाटील गटाचे वर्चस्व

  निपाणी (वार्ता) : कुन्नूर येथील दूधगंगा प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची (पीके पीएस) निवडणूक रविवारी (ता.१०) चुरशीने झाली. त्यामध्ये बोरगाव येथील सहकाररत्न उत्तम पाटील गट पुरस्कृत पॅनलने भरघोस विजय मिळवित स्थापनेपासून भाजप गटाकडे असणाऱ्या संस्थेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार निबंधक खात्याचे अमित शिंदे यांनी काम …

Read More »

तब्बल २६ वर्षानंतर ‘देवचंद’च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा तब्बल २६ वर्षानंतर दोन दिवसांचा स्नेहमेळावा दांडेली येथे पार पडला. यावेळी आजी माजी प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. संगीता पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी प्राचार्य डॉ. एम. जे. कशाळीकर यांनी, प्रत्येकांनी महाविद्यालयीन काळातील शिस्त जीवनातही पाळली पाहिजे. समाज, शाळा …

Read More »

अक्कोळच्या सव्वा दोन वर्षाच्या प्रीतम दळवीची इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद

  निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील सव्वा दोन वर्षे वय असलेल्या प्रीतम दळवी या चिमुकल्याचे आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने (इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये) नोंद झाल्याने परिसरातून त्याचे कौतुक होत आहे. प्रीतम हा अकरा महिन्याचा असतानाच एखाद्या वस्तूचे निरीक्षण केल्यास किंवा ऐकल्यास पुरेसे आहे. या सर्व गोष्टी केव्हाही विचारल्यास पटापट त्यांची माहिती …

Read More »

बळ्ळारी नाल्याची समस्या यावर्षी तरी मार्गी लागेल का?

  बेळगाव : गेल्या 2013 पासून आजपर्यंत बळ्ळारी नाल्याचा विकासाची फक्त चर्चा होत आहे. या नाल्यातील गाळ, जलपर्णी काढून बाजूने बफर झोनप्रमाणे जागा सोडत परिसरातील शेतीचे पाणी त्यात जाण्यासाठी योजना आखून शेतीचे नुकसान न होता परिसरातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची संकल्पना असली तरी ती आजतागायत प्रत्यक्षात उतरलेली नाही. शेतकऱ्यांनी वेळोवेळी मोर्चा, …

Read More »

संवाद लेखन स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न

  बेळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई यांच्या बेळगाव शाखेच्या वतीने शालेय स्तरावरील संवाद लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बेळगाव आणि परिसरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. ही स्पर्धा गट अ (५ वी ते ७ वी) आणि गट ब (८ वी ते १० वी) …

Read More »