Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

आमदार अभय पाटील यांच्या विरोधात दलित संघटनांची निदर्शने

  बेळगाव : बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या विरोधात विविध दलित संघटनांनी महापालिकेसमोर आज निदर्शने केली. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील दलितविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात विविध दलित संघटनांनी आज बुधवारी पालिकेसमोर आंदोलन केले. आमदार अभय पाटील यांनी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांचा छळ केल्याचा तसेच, …

Read More »

संजय बेळगावकरांच्या आवाहनाला रमाकांत कोंडुसकर यांचे परखड प्रत्युत्तर

  बेळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी महानगरपालिकेच्या कारभारासंदर्भात घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्यानंतर महापालिकेत सुरू झालेले वर्चस्वाचे राजकारण प्रत्येक दिवशी नवनवे वळण घेत आहे. त्यातच आज बुडाचे माजी अध्यक्ष संजय बेळगावकर यांनी, मंत्री जारकीहोळी यांनी बुडाच्या कारभाराची चौकशी करणार असल्याचे सांगितले. त्याबद्दल एकाबाजूला चौकशीचे मी स्वागत करतो. मात्र …

Read More »

आमचं सरकार आलं तर तुम्हालाही उलट टांगू; उद्धव ठाकरे

  मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणापासून ते राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारावर स्पष्ट भाष्य केले. एक लवाद जर सुप्रीम कोर्टाचे ऐकत नसेल तर देशात लोकशाही राहणार आहे की नाही असा खडा सवालही त्यांनी यावेळी केला. ज्यांनी पाशवी बहुमत मिळते अशी लोक …

Read More »

मराठ्यांना आरक्षण देणारच; एकनाथ शिंदेंचा निर्धार

  मुंबई: मी मराठा समाजाचा आहे, आयुष्यभर समाजासाठी राबलोय, मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देणार असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन त्यांनी केलं. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतोच असं …

Read More »

महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला शुगर कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ

  खानापूर : श्री महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला शुगर प्रायव्हेट लिमिटेड खानापूर 2023-24 वर्षाचा ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ व मोळी पूजन कार्यक्रम व केन कॅरियरचे पूजन श्री. चन्नबसवदेवरु रूद्रस्वामी मठ बिळकी, यांच्या दिव्य सनिध्यामध्ये कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्युत शुभारंभ राज्यसभा सदस्य श्री. इराण्णा कडाडी,  तसेच लैला शुगरचे चेअरमन व तालुक्याचे …

Read More »

सशस्त्र दलांसाठी बनावट भरतीचा घोटाळा उघड

  पोलीस, लष्करी गुप्तचरांकडून पर्दाफाश बंगळूर : पोलीस आणि मिलिटरी इंटेलिजन्सने संयुक्तपणे एका बनावट भरती घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे, ज्याने १५० तरुणांना भारतीय सशस्त्र दलात नोकरी देण्याचे आश्वासन देऊन एक कोटी रुपयांची फसवणूक केली होती. चित्रदुर्गातील श्रीरामपुर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी पोलिसांनी भारतीय लष्कराचा वाळवंट असलेला हुबळी येथील रहिवासी ४० …

Read More »

सांस्कृतिक नगरी जगप्रसिद्ध जंबो सवारीसाठी सज्ज

  म्हैसूर दसरा महोत्सवाची आज सांगता; ‘एअर शो’ला मोठा प्रतिसाद बंगळूर : जगप्रसिद्ध जंबो सवारीची उलटी गिणती सुरू झाली आहे आणि सांस्कृतिक म्हैसूर शहर त्यासाठी सज्ज झाले आहे. मंत्रमुग्ध करणारे दृश्य पाहण्यासाठी लोक आतुरतेने प्रतिक्षा करीत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या दुपारी १:४६ ते २:०८ या वेळेत राजवाड्याच्या गेटजवळ नंदीध्वज पूजन …

Read More »

राजे बँकेच्या सभासदांच्या खात्यावर १५% लाभांश जमा

  अध्यक्ष एम. पी. पाटील यांची माहिती कागल (प्रतिनिधी) : येथील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील नफ्यातुन १५% लाभांश जाहीर केला होता. ती सभासदांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी दिली. शतकमोहत्सवी वर्षात २५% व दरवर्षी प्रमाणे सतत १५% लाभांश देणारी राजे …

Read More »

पाकिस्तान हरले! अफगाणिस्तानचा आणखी एक सनसनाटी विजय

  चेन्नई : चेन्नई येथे झालेल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने आणखी एक उलटफेर केला आहे. अफगाणिस्तान संघाने अफगाणिस्तानचा आठ विकेटने पराभव केला. पाकिस्तानला 283 धावांत रोखल्यानंतर हे आव्हान 49 व्या षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. अफगाणिस्तान संघाने याआधी गतविजेत्या इंग्लंड संघाचा पराभव केला होता. 284 धावांच्या धावांचा बचाव करताना …

Read More »

म्हैसूर दसऱ्यावर दहशतवाद्यांची नजर

केंद्रीय गुप्तचर यंत्रणेची माहिती; हाय अलर्ट जाहीर बंगळूर : जगप्रसिद्ध नाडहब्ब म्हैसूर दसरा उत्सवाचे मुख्य आकर्षण जंबो सवारी दहशतवाद्यांच्या छायेत असून, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात तत्काळ सुरक्षा उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाकिस्तान आणि इसिसचे ७० अतिरेकी बनावट पासपोर्ट घेऊन भारतात घुसले असून नवरात्रीच्या काळात कर्नाटकातील म्हैसूर, …

Read More »