Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

निपाणी द्वितीय दर्जा तहसिलदारपदी अरूण श्रीखंडे यांची नियुक्ती

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील तहसीलदार कार्यालयातील ग्रेड-टू तहसीलदार प्रवीण कारंडे यांची बेंगळूर येथील महसूल मुख्यालयात बदली झाली आहे. त्यांच्या जागी अरुण श्रीखंडे यांची नियुक्ती झाली असून लवकरच ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. कारंडे हे मूळचे निपाणीचे असून त्यांची महसूल भागात २३ वर्षे सेवा झाली आहे. २०१९ मध्ये त्यांनी …

Read More »

भारताचा अफगाणिस्तानवर 8 विकेटने विजय

  नवी दिल्ली : रोहित शर्माचे वादळी शतक आणि विराट कोहलीचा फिनिशिंग टच, या जोरावर भारताने अफगाणिस्तानचा 8 विकेट आणि 15 षटके राखून पराभव केला. अफगाणिस्तानने दिलेले 273 धावांचे आव्हान भारताने दोन विकेट आणि 35 षटकांमध्ये सहज पार केले. भारताचा विश्वचषकातील हा सलग दुसरा विजय होय. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव …

Read More »

फटाके बंदीच्या पार्श्वभूमीवर निपाणीत फटाके गोदामांची कसून तपासणी

  निपाणी (वार्ता) : बेंगळूरच्या अत्तीबेले येथे फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून मिरवणूक, गणेशोत्सव, विवाह समारंभ आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुधवारी (ता.११) निपाणी मधील फटाके गोदामांची गोदामांची मंडल …

Read More »

पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा

  बेळगाव (वार्ता) : पीएम स्वानिधी योजनेच्या अंमलबजावणी आणि विस्ताराबाबत, पै रिसॉर्ट येथे योजनेचे राज्य समन्वयक एस. ए. रामदास आणि संबंधित अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी लाभार्थ्यांना आदेशाचे वाटप करण्यात आले. प्रामुख्याने रस्त्यावरील फेरीवाले, लोखंडी सेवा, जुनी भांडी विक्रेते, सुतार, बांबू विक्रेता, फ्लॉवर पॉट विक्रेते, विणकर, वॉटर विक्रेते, खाद्यपदार्थ बनवणारे …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार!

  तज्ञ समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महाराष्ट्रातून शिष्टमंडळ पाठविणे, उच्चाधिकार समितीची तात्काळ बैठक घेणे, त्याचबरोबर सीमाभागातील जनतेला मोफत आरोग्य सेवा देण्याबाबतचे महत्वपूर्ण निर्णय बुधवारी मुंबई येथे झालेल्या तज्ञ समितीच्या बैठकीत घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तज्ञ समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने होते. …

Read More »

विद्यार्थ्यांनी बनवली चपाती भाजी!

  मॉडर्न इंग्लिश स्कूलचा उपक्रम ; ९० विद्यार्थ्यांचा सहभाग निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात मुलांना शाळेचा डबा तयार करून देण्यासाठी नोकरदार महिलांना वेळ कमी पडत आहे. त्यामुळे हॉटेल व इतर उपहारगृहातून उपहार त्यांना डबे दिले जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये मुलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या …

Read More »

वीजेसह विविध मागण्यासाठी नेगील योगी रयत संघटनेचे निवेदन

बेळगाव (वार्ता) : शेतपंप संचासाठी 7 तास नव्हे 24/7, दर्जेदार वीज आणि विजेचे खाजगीकरण करू नये, शेतकऱ्यांची सर्व कर्ज वसुली थांबवावी, संपूर्ण कर्जमाफी करावी, वनविभागाची कामे तात्काळ बंद करण्यात यावी, बागर हकतम शेतकऱ्यांना हक्क बहाल करण्यात यावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन नेगील योगी रयत संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. दुष्काळाने …

Read More »

निपाणी हद्दवाढीबाबत हस्तांतराची सूचना

  सहा गावातील सर्वे क्रमांकाचा समावेश : तालुका पंचायतीला आदेश निपाणी (वार्ता) : निपाणी शहराच्या परिसरातील ग्रामीण भागातील अनेक गावांचा विस्तार वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणी नगरपालिकेने सन २०११ साली हद्द वाढीचा प्रस्ताव दिला होता. पण आजतागायत त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. अखेर निपाणी तालुका पंचायतीला हद्द वाढीसाठी परिसरातील सहा गावातील …

Read More »

ठेकेदाराचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न!

  बेळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या समोरच ठेकेदाराने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बेळगाव शहरात आज घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, ठेकेदार नागप्पा बांगी यांना 2022 मध्ये कंत्राटी पध्दतीने हलगा ते तिगडी गावापर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मिळाले होते. 6 लाख 50 हजारांचे काम ठेकेदाराने यापूर्वीच पूर्ण …

Read More »

कणेरी मठात २६, २७ रोजी मोफत सेंद्रिय शेतीबाबत मेळावा

  निपाणी (वार्ता) : श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ महासंस्थान, कणेरी, अंतर्गत श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मार्फत येथे २६ व २७ ऑक्टोबर या दोन दिवशी मोफत सेंद्रिय शेतीबाबत मेळाव्याचे आयोजन केले आहे. या सेंद्रिय शेती मेळाव्यासाठी मार्गदर्शक म्हणून सुभाष शर्मा (नैसर्गिक शेती तज्ञ, यवतमाळ), अशोकराव इंगवले (आदर्श खिल्लार गोपालक, …

Read More »