Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

घेराव प्रकरण: उच्च न्यायालयाची सिद्धरामय्या यांच्याविरोधातील खटल्याला स्थगिती

  बंगळूर : मागील भाजप सरकारच्या विरोधात आंदोलनादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधातील खटल्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. बेळगावचे कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणातील पहिले आरोपी ईश्वरप्पा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने निदर्शने केली होती. त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या सिद्धरामय्या यांच्यासह …

Read More »

आजाराला कंटाळून निपाणीत अज्ञाताने टेंम्पोमध्येच जीवन संपवले

  निपाणी : कंबर व गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळून 60 वर्षीय अज्ञात इसमाने टेम्पोमध्ये जीवन संपवल्‍याची घटना आज (शुक्रवार) निपाणीत उघडकीस आली. विशेष म्हणजे जीवन संपवलेल्‍या व्यक्तीने आपल्या खिशातील पाकीटमध्ये मराठीत तशा प्रकारची चिठ्ठी कागदावर लिहिल्याची पोलिसांना मिळुन आली. सदर मृत व्यक्ती ही महाराष्ट्रातील असावी असा प्राथमिक अंदाज शहर पोलिसांनी व्यक्त …

Read More »

निपाणी हालसिद्धनाथ साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

  माजी चेअरमन कोठीवाले यांची माघार; नवीन १२ संचालकांचा समावेश निपाणी (वार्ता) : कर्नाटक महाराष्ट्र सीमाभाचे लक्ष लागून राहिलेल्या निपाणी येथील हालसिद्धनाथ सहकारी मल्टीस्टेट साखर कारखान्याची आठवी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी अनिल मोरब यांनी दिली. यावेळी माजी चेअरमन …

Read More »

वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू; हलशीवाडी ग्रामस्थांचा इशारा

  खानापूर : वन खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करताच वनाधिकाऱ्यांनी गुरुवारी हलशीवाडी येथे येऊन निवेदन स्वीकारले आहे. यावेळी पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. गेल्या आठ दिवसात हलशी, हलशीवाडी परिसरात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच ५० …

Read More »

बेळगावचे नूतन एसपी भीमाशंकर गुळेद यांनी स्वीकारला पदभार

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून ज्येष्ठ पोलीस अधिकारी भीमाशंकर गुळेद यांनी आज पदभार स्वीकारला. भीमाशंकर गुळेद यांनी बेळगाव जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून आज पदभार स्वीकारला. मावळते एसपी डॉ. संजीव पाटील यांनी पदभार सोपवला. प्रसामाध्यमांशी बोलताना नूतन पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले की, आज मी …

Read More »

झाडशहापूरजवळ अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

  बेळगाव : बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील झाडशहापूरजवळ आज दुपारी 2 च्या दरम्यान दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव भरत बिदरभावी असून झाडशहापूर येथील रहिवासी आहे. तो कामावरून घरी चालला असता वेगवान चाललेल्या गाडीने धडक दिली. या धडकेत भरतचा जागीच मृत्यू झाला. …

Read More »

लिंगायत समाजाचा आरक्षण मोर्चा यशस्वी करा

  बसवजय मृत्युंजय स्वामी; रविवारच्या मोर्चाची तयारी पूर्ण निपाणी (वार्ता) : लिंगायत समाजाची आरक्षणाअभावी प्रगती खुंटली आहे. शिक्षण, उद्योग, आणिराजकारणासाठी या समाजाला २-ए आरक्षण मिळावे,यासाठी आतापर्यंत पाच वेळा आंदोलने केली आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने सरकारवर दबाव आणण्यासाठी बेळगाव आणि निपाणी भागातील लिंगायत समाजातर्फे निपाणी येथे रविवारी (ता.१०) सकाळी १० …

Read More »

मराठा आंदोलकावरील अन्यायाचे पडसाद निपाणीत उमटतील

  काकासाहेब पाटील; मूक मोर्चाने तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : संविधानाने सर्वच समाजाला न्याय मागण्याची तरतूद केली आहे. असे असताना जालना जिल्ह्यातील सराटी येथे मराठा समाजातर्फे शांततेने धरणे सत्याग्रह सुरू होता. त्यावेळी महाराष्ट्र शासन आणि पोलिसांनी सत्याग्रह करणाऱ्या वर अमानुष लाठीमार करणारी घटना निंदनीय आहे. यापुढील काळात महाराष्ट्रात अशा घटना …

Read More »

मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाची बैठक रविवारी

  बेळगाव : मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळाची व्यापक बैठक रविवार ता. 10 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11-00 वाजता मराठा मंदिर येथे बोलाविण्यात आली आहे. तरी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष – रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष – रणजित चव्हाण पाटील, उपाध्यक्ष सागर पाटील, सरचिटणीस – महादेव पाटील आणि …

Read More »

“मी हात जोडून आवाहन करतो की…”; पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेंची मराठा समाजाला साद

  जालना : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालेला दिसत आहे. जालन्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू असतानाच राज्यात विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. अशातच मराठा आरक्षणाच्या मागणीवरून एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्याने राज्यात खळबळ उडाली. यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी …

Read More »