Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

रिद्धीव्हिजनच्या संचालिका निशा नागेश छाब्रिया यांचे निधन

  बेळगाव : बेळगावातील रिद्धीव्हिजन केबलच्या संचालिका व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या निशा नागेश छाब्रिया यांचे आज मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती मेट्रोकास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी उद्योगपती नागेश, पुत्र सुमुख, कन्या रिद्धी, सून, जावई असा परिवार आहे. बेळगावात रिद्धीव्हिजन या नावाने पहिली केबलसेवा सुरु करण्यात पती नागेश …

Read More »

खानापूर तालुक्यातील शाळांचे विलीनीकरण नको : खानापूर तालुका समितीची पालकमंत्र्यांकडे मागणी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील पटसंख्या कमी असलेल्या शाळांचे विलीनीकरण करू नये यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देण्यात आले. कर्नाटक सरकारने नुकताच पंधरा विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमाच्या 64 शाळा, कन्नड माध्यमाच्या …

Read More »

विश्वचषकाच्या 15 शिलेदारांची घोषणा; के. एल. राहुल, सूर्याला संधी

  मुंबई : विश्वचषकासाठीच्या 15 शिलेदांराची घोषणा आज करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय शिलेदारांची नावे जाहीर केली. अपेक्षाप्रमाणे 15 खेलाडूंची निवड करण्यात आली आहे. युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांना अंतिम 15 खेळाडूमध्ये स्थान मिळाले नाही. सूर्यकुमार यादव याला संधी …

Read More »

कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसमध्ये जाणार नाही : माजी आमदार अनिल बेनके

  बेळगाव : उत्तरचे माजी आमदार अनिल बेनके पक्षांतर करणार याबाबत प्रसारमाध्यमांवर उलटसुलट चर्चा सुरू आहे. माजी आमदार अनिल बेनके यांना पक्षाने विधानसभेचे तिकीट नाकारल्यामुळे ते पक्षांतर करणार असल्याचे चर्चेला उधाण आले होते. मात्र यात काही तथ्य नाही ती केवळ अफवाच असल्याचे माजी आमदार अनिल बेनके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना …

Read More »

१३४ तालुक्यांच्या संयुक्त सर्वेक्षणानंतर दुष्काळग्रस्तची अधिकृत घोषणा

  मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय बंगळूर : पावसाळ्यात जून आणि ऑगस्टमध्ये राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी आणि महसूल विभागाच्या संयुक्त पाहणीनंतर राज्यातील १३४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले जातील, असे महसूलमंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी सांगितले. याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, नैसर्गिक आपत्तींबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची …

Read More »

दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी पैशांऐवजी १० किलो तांदूळ : मंत्री मुनियप्पा

  बंगळूर : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना पैशांऐवजी १० किलो तांदूळ दिला जाईल, असे अन्नमंत्री के. एच. मुनियप्पा यांनी सोमवारी सांगितले. आज शहरात पत्रकारांशी बोलताना मंत्री म्हणाले की, राज्यातील ११४ तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. या तालुक्यांना १० किलो तांदूळ वाटपाची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळी तालुक्यांमध्ये पाच किलो तांदळासाठी रोख …

Read More »

सेवनिवृत्ती निमित्त आर. ए. बन्ने यांचा मोहनलाल दोशी विद्यालयात सत्कार

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात २४ वर्षे सेवा बजावणारे शिक्षक रामचंद्र बन्ने यांचा सेवनिवृत्तीनिमित्त सपत्नीक प्रमुख पाहुणे जनता शिक्षण मंडळाचे संचालक प्रदीप मोकाशी यांच्या हस्ते रोपटे व सन्मानपत्र देऊन बन्ने दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी शिक्षक प्रतिनिधी आर.आर. कपले यांनी स्वागत केले. मुख्याध्यापिका एस. …

Read More »

आयपीएस संजीव पाटील यांची बदली; डॉ. भीमाशंकर गुलेद बेळगावचे नवे एसपी

  बेळगाव : राज्याच्या पोलीस विभागात एकूण 35 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांची ही सर्वात मोठी बदली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे सरकारी आदेश रात्री उशिरा निघाले. डॉ. भीमाशंकर गुलेद बेळगावचे नवे एसपी डॉ. भीमाशंकर गुलेद आयपीएस (KN- 2012), पोलिस उपायुक्त, …

Read More »

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सन्मती विद्यामंदिरचे यश

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ येथील सन्मती विद्यामंदिर मधील सोहम साळवे व प्रतिक नेजे या विद्यार्थ्यांनी तालुका पातळी विज्ञान प्रदर्शनामध्ये मांडलेल्या ‘गॅस‌ लिकेज डिटेक्टर’ या माॅडेलने तृतीय क्रमांक पटकावला. गॅस गळती स्वयंचलीत पध्दतीने शोधून काढून त्याची माहिती देणारे मशीन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार केलेला होता. सध्याच्या …

Read More »

शिवमंदिरात तिसऱ्या सोमवारीही भाविकांची गर्दी

  मंदिरात विद्युत रोषणाई ; साबुदाणा खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारीही (ता.४) शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात मंदिरासह इतर मंदिरात ‘हर हर महादेव’चा गजर दिवसभर सुरू होता. महादेव गल्लीतील महादेव मंदिरात नितीन गुरव, सचिन सुतार, किरण भालेभालदार व गणेश मंडळाच्या …

Read More »