
सहकाररत्न उत्तम पाटील ; सभासदांना विविध सुविधांचा लाभ
निपाणी (वार्ता) : सभासदांचा विश्वास, निस्वार्थी संचालक मंडळ आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळे संस्थेची वर्षानुवर्षे प्रगतीची घोडदौड सुरू आहे. यंदा संस्थेला १८ कोटी ३२ लाखावर निव्वळ नफा झाल्याची माहिती बोरगाव अरिहंत बँकेचे सहकारत्न उत्तम पाटील यांनी दिली. यावेळी युवा उद्योजक अभिनंदन पाटील उपस्थित होते.
उत्तम पाटील म्हणाले, अहवाल सालात संस्थेत एकूण २३ हजार ३४२ सभासद, ७ कोटी १ लाखावर भाग भांडवल, ११० कोटी ८९ लाखावर निधी, १७२६ कोटींची ठेव, ६१७ कोटीवर गुंतवणूक, १२५५ कोटीवर कर्ज वितरण करुन संस्थेस अहवाल सालात १८ कोटी ३२ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.
अभिनंदन पाटील यांनी, अरिहंत संस्थेच्या माध्यमातून सहकारासह धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा कार्याला बळ दिले आहे. आरोग्य, शिक्षण, संस्कार, संस्कृतीसह इतर क्षेत्रातही प्रोत्साहन देण्यात येत आहे. दिवंगत रावसाहेब पाटील (दादा) यांची शिकवण लक्षात घेत संस्था चांगल्या पद्धतीने सुरू आहे. लवकरच या संस्थेच्या महाराष्ट्रात कोल्हापूर, पुणे, नांदणी, इस्लामपूर, म्हैशाळ, नांद्रे, कुंभोज, म्हाकवे, दुधगाव, विटा, सातारा, कोथरूड, पिंपरी चिंचवड, गांधीनगर, कोथळी, रुकडी, मिरज तासगाव तर कर्नाटकात मुडलगी, यमगर्णी, कित्तूर, महेशवाडी, दरूर, एकसंबा, शेंडूर, येडूर, कडकोळी, चंदरगी, यरगट्टी, लोकापूर, मुधोळ, कल्लोळी, रामदुर्ग, कोन्नूर, कौजलगी आणि मुन्नोळी येथे शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी बँकेचे पदाधिकारी, सीईओ अशोक बंकापूरे यांच्यासह संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta