Friday , November 22 2024
Breaking News

LOCAL NEWS

शहर समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली शरद पवार यांची भेट

  शरद पवार 2 सप्टेंबर रोजी बेळगावात बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी आठ वाजता बारामती येथे गोविंद बाग या श्री. शरद पवार यांच्या निवासस्थानी श्री. शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली आणि याप्रसंगी महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न दावा लवकरात लवकर सुनावणीस यावा यासाठी प्रयत्न करण्याचे …

Read More »

शिमोगा येथे अपघातात तिघांचा मृत्यू, पाच जण जखमी

  बंगळूर : शिमोगा येथे शनिवारी दोन मोटारमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. शिमोगा तालुक्यातील मुद्दीनकोप्प ट्री पार्क येथे लायन सफारीजवळ हा अपघात झाला. शिमोगाहून सागरकडे जाणारी इनोव्हा मोटामर आणि सागरहून शिमोग्याच्या दिशेने येणारी स्विफ्ट मोटार …

Read More »

राज्यात डेंगीचा उद्रेक; सक्रिय डेंगी रुग्णांची संख्या ३४३

  झिका विषाणूचीही भीती बंगळूर : राज्यातील अनेक भागात डेंगी तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. यामुळे लोकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. हसनमध्ये डेंगीच्या तापाने सहा मुलांचा मृत्यू झाल्यानंतर, बंगळुरमध्ये एका ११ वर्षीय मुलाचा डेंगी तापाने मृत्यू झाला. याशिवाय, प्राणघातक झिका विषाणू देखील दिसून आला आहे, ज्यामुळे लोक अधिक …

Read More »

मंदिराच्या मालमत्तेप्रकरणी माजी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात प्रमोद मुतालिकांचे आरोप

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मोदगा गावातील श्री मारुती मंदिराची सुमारे २०० कोटी रुपयांची ९३ एकर जमीन बळकावणाऱ्या बेळगावच्या माजी जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा तीव्र लढा देऊ, असा इशारा श्री राम सेना प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी दिला आहे. आज बेळगाव शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्नाटक राज्यात …

Read More »

संत मीरा अनगोळ, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर यांना विजेतेपद

  बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर देवेंद्र जिंनगौडा स्कूल शिंदोळी आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धत संत मीरा अनगोळ, शांतीनिकेतन स्कूल खानापूर यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. प्राथमिक गटातील अंतिम लढतीत शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेने संत मीरा अनगोळ शाळेचा पेनाल्टी शुटआऊटवर 5-4 असा पराभव करीत विजेतेपद …

Read More »

युवा समितीच्यावतीने मच्छे व लक्ष्मीनगर मच्छे येथील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण

  बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून युवा समितीच्या वतीने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते त्यानुसार आज शनिवार दिनांक ६ जुलै २०२४ रोजी मच्छे येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. सुधीर हावळ होते. …

Read More »

बेळगावात पश्चिम बंगालमधील महिला अत्याचाराविरोधात निदर्शने

  बेळगाव : बेळगाव उन्नती ट्रस्टच्या महिला सदस्यांनी पश्चिम बंगालमधील महिला आणि कुटुंबांवरील अत्याचाराविरोधात निदर्शने केली. बेळगाव उन्नती ट्रस्टच्या महिला सदस्य आणि विविध महिला संघटनांनी पश्चिम बंगालमधील संदेश खली येथे महिला आणि कुटुंबांवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी चेन्नम्मा सर्कलमध्ये आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तृणमूल काँग्रेसचे सरकार बरखास्त करण्याचे …

Read More »

दक्षिण भागातील वडगाव, शहापूर परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा

  बेळगाव : बेळगाव दक्षिण भागातील वडगाव, लक्ष्मी रोड, भारत नगर आणि नाथ पै चौक शहापूर परिसरात ८ दिवसातून एकदा पिण्याचे पाणी सोडण्यात येते. पण ते पाणी इतके गढूळ आहे की पिण्यास अयोग्य आहे. एल अँड टी कंपनीकडे बेळगावच्या पाण्याचे नियोजन दिल्यापासून पाणी पुरवठ्याचे तीन तेरा वाजले आहेत. बेळगावात कावीळ, …

Read More »

सुप्रसिद्ध डॉक्टर, भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांचा आगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा

  बेळगाव : बेळगावच्या सुप्रसिद्ध डॉक्टर आणि भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपला वाढदिवस आर्ष विद्या मंदिरातील मुली आणि राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सदस्यांसोबत नुकताच आगळ्या पद्धतीने साजरा केला. वाढदिवसानिमित्त श्री चित्प्रकाशनंद स्वामीजी यांच्या हस्ते नियती फाउंडेशन आणि राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या संस्थापक -अध्यक्ष असलेल्या डॉ. सोनाली सरनोबत यांचा …

Read More »

लक्ष्मीबाई जयवंत कोंडुसकर प्रतिष्ठानच्या वतीने स्कूल बॅगचे वितरण

  बेळगाव : समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने नेहमी समाजहितासाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर व त्यांचे बंधू श्री. चंद्रकांत कोंडुसकर यांनी लक्ष्मीबाई जयवंत कोंडुसकर प्रतिष्ठानच्या वतीने मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दप्तर (स्कूल बॅग)चे वाटप गव्हर्मेंट मराठी पूर्ण प्राथमिक …

Read More »