Wednesday , December 17 2025
Breaking News

LOCAL NEWS

मुलीच्या जन्मानंतर निलजी येथील बाळंतिणीचा मृत्यू

  बेळगाव : मुलीला जन्म दिल्यानंतर बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी बिम्स हॉस्पिटलच्या प्रसूती वॉर्डमध्ये घडली. बेळगाव तालुक्यातील निलजी गावातील बाळंतिणी अंजली पाटील (३१) असे मृत बाळंतिणीचे नाव आहे. प्रसूतीच्या त्रासामुळे बिम्स यांना काल संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका मुलीला जन्म दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला.

Read More »

बेळगावात आयकर विभागाचे धाडसत्र!

  बेळगाव : मंगळवारी भल्या पहाटेपासून बेळगावमधील काही उद्योजक आणि व्यावसायिकांच्या घरांवर आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. एकाच वेळी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे उद्योजक वर्तुळाची झोप उडाली आहे. बेहिशोबी मालमत्ता जमा केलेल्या काही मंडळींना याचा दणका बसला असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये गणेशपूर येथील अशोक आयर्नचे मालक अशोक हुंबरवाडी, …

Read More »

प्रदेशाध्यक्षपदासाठी निवडणुक लढविण्याची तयारी

  बसनगौडा पाटील यत्नाळ; विजयेंद्र यांना आव्हान बंगळूर  : माझी प्रदेश भाजप अध्यक्षपदासाठी आमच्या गटातून एकमताने उमेदवार म्हणून निवड झाल्यास निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे भाजपचे असंतुष्ट नेते बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी जाहीर केले. विद्यामान प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या विरोधातही निवडणुक लढविण्याची तयारी असल्याचे सांगून त्यांना त्यांनी आव्हान दिले. विजापूर …

Read More »

कर्ज वसुलीसाठी त्रास देणाऱ्या मायक्रो फायनान्सवर कठोर कारवाई करा : महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा यांचा इशारा

  बेंगळुरू : कर्ज परतफेडीदरम्यान मायक्रो फायनान्स कंपन्यांनी जास्त त्रास दिल्यास कारवाई करण्याचा कडक इशारा महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिला आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज परतफेडीवेळी होत असलेल्या छळा संदर्भात आज महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी पार्वती, मंत्री भैरती सुरेश यांना दिलासा

  उच्च न्यायालयाने ईडीच्या समन्सला दिली स्थगिती बंगळूर : उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाने सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती आणि मंत्री भैरती सुरेश यांना म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जमीन वाटपाशी संबंधित सुनावणीत हजर राहण्यासाठी बजावलेल्या नोटीसला स्थगिती दिली. ईडीची नोटीस जारी होताच, पार्वती सिद्धरामय्या आणि …

Read More »

महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सोन्याचे दागिने लांबविले

  राणी चन्नम्मा नगर परिसरातील घटना बेळगाव : भरदिवसा महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून साडेसात तोळ्याचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना राणी चन्नम्मा नगर सेकंड स्टेज उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या हद्दीत सोमवारी सकाळी घडली आहे. या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ माजली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुरुगन हे एलअँडटी कंपनीचे अधिकारी …

Read More »

विद्याप्रसारक मंडळाची ५५ वर्षाच्या आनंदोत्सवाची जय्यत तयारी

  बेळगाव (सौजन्य मिलिंद देसाई) : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती करीत असलेल्या एसपीएम रोड येथील विद्या प्रसारक शिक्षण मंडळाचे 55 व्या वर्षात पदार्पण होत आहे. यानिमित्त 28 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध गायिका बेला शेंडे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. बहुजन समाजातील …

Read More »

बेळगावात आणखी एक बालक विक्री प्रकरण उघडकीस; तीन आरोपींना अटक

  बेळगाव : अलीकडे मुलांच्या विक्रीचे प्रकरण खूप गाजत आहे. हुक्केरी तालुक्यातील सुलतानपूर येथील पाच वर्षांच्या मुलाची विक्री केल्याचा गुन्हा हुक्केरी पोलिसांनी उकरून काढला असून महाराष्ट्रातील तीन आरोपींना अटक केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील मड्याळ येथील संगीता हमण्णावर, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील निवली येथील मोहन तावडे आणि त्यांची पत्नी …

Read More »

युवा समिती आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेचा माध्यमिक गट आणि महाविद्यालय गटाचा निकाल जाहीर

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२५ चे माध्यमिक गट आणि महाविद्यालय गटाचा निकाल जाहीर करीत आहोत* माध्यमिक गटातील विजेते पहिला क्रमांक : वेदांत चंद्रकांत कुगजी (चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूर) दुसरा क्रमांक : प्रसाद बसवंत मोळेराखी (मराठी विद्यानिकेतन बेळगाव) तिसरा क्रमांक : सई शिवाजी शिंदे (कुद्रेमणी …

Read More »

मराठी भाषेला प्राधान्य द्या; प्रा. डॉ. गोपाळ पाटील

  बेळगाव : विद्यार्थ्यांनी सोपी आहे म्हणून कॉलेजमध्ये हिंदी भाषा न घेता आपली मातृ भाषा मराठी घ्यावी कारण मराठी भाषा घेतल्याने एकदा गुण कमी मिळेल पण आपल्या भाषेचे ज्ञान सखोल वाढेल. मराठी भाषा घेतल्याचे खूप फायदे आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांनी मराठी विषय घ्यावा, असे विचार मराठी भाषा प्रेरणा मंचचे अध्यक्ष व …

Read More »