Monday , September 21 2026
Breaking News

मराठी भाषेला प्राधान्य द्या; प्रा. डॉ. गोपाळ पाटील

Spread the love

 

बेळगाव : विद्यार्थ्यांनी सोपी आहे म्हणून कॉलेजमध्ये हिंदी भाषा न घेता आपली मातृ भाषा मराठी घ्यावी कारण मराठी भाषा घेतल्याने एकदा गुण कमी मिळेल पण आपल्या भाषेचे ज्ञान सखोल वाढेल. मराठी भाषा घेतल्याचे खूप फायदे आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांनी मराठी विषय घ्यावा, असे विचार मराठी भाषा प्रेरणा मंचचे अध्यक्ष व बाळगोपाळ कंपनीचे संचालक प्रा. डॉ. गोपाळ पाटील यांनी व्यक्त केले.

व्हीं. एस. पाटील हायस्कूल मच्छे येथे एस एस एल सी व्याख्यानमालेच्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्राम पंचायत सदस्य महादेव मंगणाकर होते.
सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक ए. बी. पाटील यांनी प्रास्ताविक करून व्याख्यान मालेचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी डॉ. गोपाळ पाटील, महादेव मंगणाकर, यांच्यासह पाहुण्याच्या हस्ते कुंडीतील रोपाला पाणी घालून व्याख्यान मालेचे उद्घाटन केले.
याप्रसंगी सागर कणबरकर, विनायक लोहार यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी निवृत्त सुभेदार मधू पाटील, टी. व्हि. पाटील निवृत्त शिक्षक सुरेश पाटील, खादरवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक राजाराम खवणेकर, महेश जाधव, के बी रांगाई, किशोर पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या व्याख्यान मलेतील मराठी विषयाचे पहिले पुष्प लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे मराठी विषयाचे शिक्षक शिवाजी हसनेकर यांनी गुंफले.
अजित नाकडी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *