Thursday , December 18 2025
Breaking News

LOCAL NEWS

बॅ. नाथ पै हे नेहमीच सीमाप्रश्नाविषयी गांभीर्य असायचे : माजी महापौर मालोजी अष्टेकर

    बेळगाव : बॅरिस्टर नाथ पै स्मृतिदिन भारताचे थोर सुपुत्र माजी खासदार बॅरिस्टर नाथ पै यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहापूर येथील बॅरिस्टरनाथ पै चौकात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करून नवीन फलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात श्री. विनय याळगी व रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते बॅरिस्टरनाथ पै यांच्या फोटोचे पूजन करून पुष्पहार अर्पण …

Read More »

बॅ. नाथ पै व्याख्यानमाला : रविवारचे व्याख्याते ज्ञानेश्वर महाराज बंडगर

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या ५० व्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प रविवार दि. १९-०१-२०२५ रोजी सायं. ५-३० वा. एसीपीआर सभागृह, गुरुदेव रानडे मंदिर, हिंदवाडी, बेळगाव येथे सांगोला येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर हे ‘संतविचार आणि समकाल’ या विषयावर गुंफणार आहेत. यानिमित्त त्यांचा परिचय- …

Read More »

कवटगीमठ यांचे समाजसेवेचे कार्य कौतुकास्पद : पंचम शिवलिंगेश्वर महास्वामींचे प्रतिपादन

  माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा चिकोडी : देवाने शुद्ध अंतकरणाने सत्कार्य करण्याचे शरीर आपल्याला जीवन जगण्यासाठी दिले आहे. चार तत्त्वांचे पालन करून आदर्श जीवन जगावे. माणसाची वाटचाल ही चांगले उद्देश ठेवून व्हावी. कवटगीमठ कुटुंबीयांनी आपला वाढदिवस वैयक्तिक न साजरा करता समाज हितासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने RYLA चे आयोजन

  रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने सेंट जर्मेन इंडियन स्कूल, भडकल गल्ली, बेळगाव येथे २ दिवसांचे RYLA चे आयोजन करण्यात आले होते. RYLA ( ROTARY YOUTH LEADERSHIP AWARDS) हा तरुणांच्यात नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी रोटरी क्लबद्वारे आयोजित केलेला एक कार्यक्रम आहे. ZRR Rtr. हर्ष शिंदे हे प्रमुख पाहुणे तर …

Read More »

सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच खरी हुतात्म्यांना आदरांजली!

  बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १७ जानेवारी १९५६ रोजी झालेल्या आंदोलनात प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना आज शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे अभिवादन करण्यात आले. समितीतर्फे हुतात्मा चौक, कंग्राळी खुर्द, खानापूर, निपाणीत समिती नेते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली. हुतात्मा चौकात अभिवादन कार्यक्रम पार पडल्यानंतर रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये कै. भाई एन्. डी. पाटील यांना आदरांजली

    बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये कै.भाई एन्. डी. पाटील यांना आदरांजली देण्यात आली. भाई एन्. डी. पाटील यांचे कार्य शाळेतील समाज विषय शिक्षक इंद्रजीत मोरे यांनी विशद केले. एन्. डी‌. पाटील यांचा जन्म १५ जुलै १९२९ साली सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी १९५५ साली अर्थशास्त्र …

Read More »

अयोध्या श्रीराम मंदिराचे प्रभारी गोपाजी शनिवारी बेळगावात

    बेळगाव : अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिर अनावरणास येत्या 22 जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बेळगावात गेल्या 11 जानेवारीपासून सुरू असलेल्या हनुमान चालीसा उत्सवात सहभागी होण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री आणि अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे प्रभारी श्री …

Read More »

उद्यापासून सार्वजनिक वाचनालयाची बॅ. नाथ पै व्याख्यानमाला

  बेळगाव : 176 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय, या संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या 50 व्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे उद्घाटन शनिवार दि. 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता एसीपीआर सभागृह, गुरुदेव रानडे मंदिर, हिंदवाडी बेळगाव येथे बेळगावचे इंजिनियर व बिल्डर्स मा. श्री. अनंतराव नारायण पाटील यांच्या हस्ते होणार आहे. …

Read More »

“संगीत मानापमान” चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेते सुबोध भावे यांची बेळगावात उपस्थिती; प्रेक्षकांशी साधला संवाद…

  बेळगाव : बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या संगीत मानापमान या चित्रपटाच्या विशेष शो ला अभिनेते सुबोध भावे आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी उपस्थिती दर्शवून प्रेक्षकांशी संवाद साधला. बेळगावच्या जनतेने संगीत मानापमान चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल अभिनेते सुबोध भावे यांनी आभार मानले. यावेळी चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांशी सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी यांनी …

Read More »

कै. डॉ. अशोक सखदेव यांना बेळगावातील कलाकारांच्यातर्फे रविवारी “स्वर श्रध्दांजली”

    बेळगाव : बेळगावातील विविध संगीत संस्थांशी संबंधित असलेले संगीत प्रेमी डॉक्टर अशोक सखदेव यांना बेळगावातील कलाकारांच्यातर्फे स्वर श्रध्दांजली कार्यक्रमाच्याद्वारे अभिवादन करण्यात येणार आहे. रविवार दि. १९ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत पंडित रामभाऊ विजापूरे स्वर मंदिर, बुधवार पेठ, टिळकवाडी येथे सदर स्वर श्रध्दांजली कार्यक्रम होणार …

Read More »