बेळगाव : आगामी 14, 15 आणि 16 जानेवारी रोजी बेळगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठांच्या शरीरसौष्ठव स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन समितीचे सह चेअरमन पद स्वीकारावे अशी विनंती बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांना करण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन समिती चेअरमन म्हणून जिल्हाधिकारी …
Read More »LOCAL NEWS
धारवाडला स्वतंत्र महापालिकेचा दर्जा
हुबळी-धरवाड महापालिकचे विभाजन बंगळूर : हुबळी-धारवाड महानगर पालिकेचे विभाजन करून स्वतंत्र धारवाड महानगर पालिकेच्या निर्मितीला गुरूवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे आता हुबळी आणि धारवाड या दोन स्वतंत्र महापालिका अस्तित्वात येणार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानसौध येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हुबळीपासून धारवाडला तात्काळ वेगळे करून महानगर पालिका स्थापन …
Read More »राज्यात बसच्या तिकीट दरात १५ टक्के वाढ
नवीन वर्षाचा प्रवाशांना धक्का; दरवाढ पाच जानेवारीपासून लागू बंगळूर : राज्य सरकारने बस प्रवाशांना नवीन वर्षासाठी झटका दिला आहे, गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) आणि बंगळुर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) सह चार महामंडळांच्या बस तिकीट दरात १५ टक्याने वाढ करण्यास मंजूरी देण्यात आली. ही …
Read More »अनगोळमधील संभाजी महाराज मूर्ती अनावरण समारंभ अडकला गोंधळात; शिव-शंभू भक्तांचा विरोध
बेळगाव : शहरातील अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्ती अनावरण आणि समाज भवन उद्घाटन समारंभ गोंधळात अडकला आहे. एका बाजूला, गावकऱ्यांनी सर्व तयारी पूर्ण करून अनावरण समारंभाला सुरुवात करण्यासाठी पालिकेला वाव दिला, तर दुसऱ्या बाजूला महापौर आणि उपमहापौर यांच्या उपस्थितीत आज केवळ वास्तुशांती कार्यक्रम पार पडला. बेळगाव महापालिकेस भेट …
Read More »खराब वातावरणामुळे रब्बी पीके धोक्यात!
बेळगाव : शेतकरी हा सदैव सलाईनवरच असतो अशीच परिस्थिती सतत निर्माण झालेली आहे. कारण अतिवृष्टीने दुबार पेरणी लागली. त्यात ऐन बहरात आलेल्या भातपीकांवर करपा रोग पडल्याने उतार कमी तर झालाच. पण आता भातपीकाला गेल्यावर्षीपेक्षा क्विंटलला 1000/1500 रु. भाव कमी झाल्याने मशागत खर्च वाढल्याने कसा ताळमेळ बसवावा यात शेतकरी सापडलाय. …
Read More »तुकाराम बँकेच्या चेअरमनपदी प्रकाश मरगाळे तर व्हा. चेअरमनपदी नारायण पाटील यांची बिनविरोध निवड
बेळगाव : बेळगाव शहरातील प्रतिष्ठित श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक आज बुधवारी बिनविरोध पार पडली. तुकाराम बँकेच्या चेअरमनपदी पुनश्च पाचव्यांदा प्रकाश मरगाळे यांची तर व्हा. चेअरमनपदी नारायण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक या बेळगाव शहरातील प्रतिष्ठित बँकांच्या संचालक मंडळाच्या …
Read More »कॅपिटल वन एकांकिका वेळापत्रक जाहीर
बेळगाव : 13 व्या भव्य एकांकिका स्पर्धा दि. 4 व 5 जाने. रोजी होणार असून स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. नीटनेटके आयोजन व पारदर्शकतेच्या जोरावर आंतरराज्य पातळीवर सदर स्पर्धा खूप मानाची मानली जाते. स्पर्धेतील रंजकता व दर्जा कायम ठेवण्यासाठी, स्पर्धक संघांची निवड आभासी पद्धतीने करण्यात येते. वैभवशाली …
Read More »स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाची आईने केली हत्या!
बेळगाव : स्वतःच्या पोटच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधम बापाची मुलीच्या आईनेच निर्घृण हत्या करून शरीराचे तुकडे केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथील उमराणी येथे घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीमंत इटनाळ नामक व्यक्ती रोज दारू पिऊन पत्नी आणि मुलीला मारहाण करत होता. रात्री दारू पिऊन पुन्हा पत्नी आणि …
Read More »इंटरॅक्ट क्लब ऑफ मण्णूरची स्थापना
मण्णूर : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कलमेश्वर हायस्कूल, मण्णूर येथे “इंटरॅक्ट क्लब ऑफ मण्णूर” या नवीन इंटरॅक्ट क्लबचा स्थापना समारंभ डीजी आरटीएन शरद पै यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी अधिष्ठाता अधिकारी आरटीएन ॲड. महेश बेल्लद उपस्थित होते. या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे अध्यक्षा प्रीती चौगुले यांना …
Read More »थर्टी फस्टला मद्यपींनी रिचवले ३०८ कोटींचे मद्य!
बंगळूर : नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित पार्ट्या आणि इतर ठिकाणी मद्याला मोठी मागणी होती. थर्टी फर्स्टच्या केवळ अर्ध्याच दिवसात राज्य पेय महामंडळाने ३०८ कोटींची मद्यविक्री केली. यातून कोट्यवधींचा अबकारी कर वसूल झाला. गतवर्षी १९३ कोटींची मद्यविक्री झाली होती. त्या तुलनेत यंदा दीडपट अधिक विक्री झाली. मंगळवारी (दि. ३१) राज्यातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta