Wednesday , December 17 2025
Breaking News

LOCAL NEWS

अस्वलाच्या हल्ल्यातील जखमीला शासनाच्या वतीने 10 लाखाची नुकसान भरपाई

  खानापूर : खानापूर तालुक्यातील माण गावातील रहिवासी सखाराम गावकर हे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी होऊन त्यांचा पाय पूर्णतः निकामी झाला आहे. याची सरकारने दखल घेऊन वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी शासनाच्या वतीने 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली. सखाराम गावकर यांच्यावर सध्या बेळगाव येथे उपचार सुरू आहेत. सुरवातीला माणच्या ग्रामस्थांनी घरोघरी …

Read More »

शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित सोडवा अन्यथा खुर्च्या खाली करा

    बेळगाव : शेतकऱ्यांना मारक ठरणारे तिन्ही कायदे रद्द करा, स्वामीनाथन आयोग अमलात आणा, ऊसाला 4500 रु. भाव द्या, विद्युत खासगीकरण थांबवा, बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपास रद्द करा, बळ्ळारी नाल्याची साफसफाई करुन परिसरातील शेतकऱ्यांना वाचवा, गेल्या वर्षीपेक्षा भाताला 1500/2000 रु.भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान थांबवत भाव वाढवत सरकारने भात, सोयाबिन …

Read More »

येळ्ळूर साहित्य संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना पुरस्कारासाठी आवाहन

  येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने बेळगाव परिसरातील व तालुक्यातील विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, प्रत्येक वर्षी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये सीमाभागात दहावी परीक्षेत मराठी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देण्यात येते. त्याचबरोबर येळ्ळूर येथील श्री …

Read More »

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

  बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयांमध्ये तीन दिवस वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीतानी झाली. यानंतर कॉलेजच्या प्राचार्या ममता पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यानंतर विश्वभारत सेवा समिती बेळगाव संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नंतर क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन …

Read More »

येळ्ळूर -सुळगा ते राजहंसगड देसूर कॉर्नर पर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात : दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर

  येळ्ळूर : येळ्ळूर सुळगापासून ते देसूर राजहंसगड कॉर्नर पर्यंतच्या रस्त्याची पार दुरावस्था झाली होती, याची दखल घेत या भागाच्या आमदार तसेच महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या तीन किलोमीटर पर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण करून त्यावर डांबरीकरण करण्यासाठी 2 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मंजूर केला होता. त्या रस्त्याच्या कामाचा …

Read More »

खंजर गल्ली येथे रात्री भीषण आग; 5 दुकाने जळून खाक

  बेळगाव : बेळगाव येथील खंजर गल्लीत काल रात्री अचानक आग लागून एका दुचाकीसह 5 दुकाने जळून खाक झाली. नगरसेवक मुजम्मील ढोनी यांनीही भेट देऊन अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिस, महापालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

Read More »

बेळगाव येथे ‘खेळ पैठणीचा, सन्मान नारीचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न

  राधिका राजगोळकर पैठणीची मानकरी बेळगाव : तारांगण आयोजित आणि सुनील टेक्सटाईल्स प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा, सन्मान नारीचा’ होम मिनिस्टर स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. सुनिल टेक्स्टाईलच्या टेरेसवर झालेल्या या कार्यक्रमात राधिका राजगोळकर यांनी पैठणी जिंकत विजेतेपद पटकावले, तर जान्हवी बद्री उपविजेती ठरली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती सुनील काठारिया …

Read More »

बँकेच्या प्रगतीसाठी सभासदांनी सत्ताधारी पॅनलच्या पाठीशी उभे रहावे : दिगंबर पवार

    बेळगाव : मराठा समाजाची बँक म्हणून ओळखली जाणारी मराठा सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या 22 डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पॅनलने शिवाजीनगर मधून आपल्या प्रचाराची सुरुवात केली. शिवाजीनगर भागातील प्रशांत चिगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून उर्वरित संचालकांची निवड प्रक्रिया 22 डिसेंबर रोजी पार …

Read More »

काँग्रेस अधिवेशनाला ऐतिहासिक महत्त्व; 26 आणि 27 डिसेंबर रोजी भव्य शताब्दी महोत्सव साजरा : के. सी. वेणुगोपाल

  बेळगाव : भारतीय राजकारणाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरलेल्या बेळगावमध्ये 1924 साली महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी महोत्सव 26 आणि 27 डिसेंबर रोजी भव्यपणे साजरा करण्यात येईल, अशी माहिती एआयसीसी राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. आज बेळगाव येथील काँग्रेस कार्यलयात राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, रणदीपसिह सुरजेवाला, …

Read More »

भीमगड परिसरातील 754 कुटुंबे व 3059 गावकऱ्यांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर : मंत्री ईश्वर खंड्रे

  तळेवाडी जंगलात वनमंत्र्यांची ग्रामस्थांशी बैठक खानापूर : भीमगड वनपरिक्षेत्रातील गावांतील रहिवाशांना योग्य मोबदला देऊन त्यांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर केले जाईल, असे आश्वासन वन, जीवशास्त्र आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खांड्रे यांनी दिले आहे. सोमवारी रात्री मंत्री खांड्रे यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तळेवाडीला भेट देऊन ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी सरकार स्थलांतरित गावकऱ्यांना …

Read More »