Wednesday , December 17 2025
Breaking News

LOCAL NEWS

कर्णबधिरांच्या मागण्यांसाठी सुवर्णसौधसमोर आंदोलन

  बेळगाव : कर्णबधिरांच्या विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य कर्णबधिर संघटनेच्या नेतृत्वाखाली सुवर्णसौधसमोर शेकडो कर्णबधिरांनी आंदोलन केले असून, सरकारकडून न्याय मागण्यात आला आहे. कर्णबधिरांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, या मागणीसाठी आज सुवर्णसौधसमोर मोठ्या प्रमाणात कर्णबधिरांनी आंदोलन केले. कर्नाटक राज्य कर्णबधिर संघटनेच्या वतीने आयोजित या आंदोलनात शेकडो आंदोलकांनी भाग घेतला. कर्नाटक …

Read More »

पंचमसाली आंदोलनात पोलिसांकडून बॅनर जप्त

  बेळगाव : पंचमसाली समाजाच्या आंदोलनात आज पुन्हा एक नवा वाद निर्माण झाला आहे. लाठीचार्जच्या फोटोंसह बॅनर लावल्याने पोलिसांनी तो जप्त केला. यामुळे पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पंचमसाली समाजाच्या आंदोलनात आज डॉ. बी. आर. आंबेडकर उद्यानात पुन्हा एकदा हायड्रामा पाहायला मिळाला. सुवर्ण सौध परिसरात झालेल्या लाठीचार्जचे …

Read More »

७०% गुडघेदुखीच्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरज लागत नाही

  बेळगाव : मानवी शरीरातील सांध्याची प्रतिबंधात्मक काळजी व त्यावरील अत्याधुनिक उपचार या विषयी दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉ. नरेंद्र वैद्य यांच्या टीम मधील डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी वरेरकर नाट्य गृहामधील कार्यक्रमात उपस्थितना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री. जगदीश कुंटे …

Read More »

घटप्रभा रेल्वे स्थानकाला वंदे भारत थांबा : खासदार इरण्णा कडाडींच्या मागणीला यश

  बेळगाव : हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस घटप्रभा रेल्वे स्थानकावर थांबवण्याचे आदेश केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्याचे खासदार इरण्णा कडाडी यांनी सांगितले आहे. राज्यसभेचे खासदार इरण्णा कडाडी यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला घटप्रभा रेल्वे स्थानकावर थांबा …

Read More »

लिंगायत पंचमसाली आंदोलनकर्त्यांवर लाठीमार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी

  बसवजय मृत्युंजय स्वामीजी बेळगाव : लिंगायत पंचमसाली आरक्षण आंदोलनकर्त्यांवर लाठीमार झाल्याच्या घटनेचा निषेध करत श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथे अनिश्चितकाळासाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. लिंगायत पंचमसाली आरक्षण आंदोलनकर्त्यांवर लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ आणि लिंगायत समाजाचा अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माफी मागावी, या मागणीसाठी श्री …

Read More »

ख्रिसमसचा संयुक्तिक कार्यक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात

  बेळगाव : बेळगाव शहरात नाताळ सणाची जय्यत तयारी सुरू असताना येथील मेथोडिस्ट चर्चच्या आवारात कमिशन फॉर इक्यूमेनिझम आणि सेंट्रल मेथोडिस्ट चर्च, बेळगाव यांच्या सहकार्याने ऑल कर्नाटक युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्युमन राईट्सद्वारे आयोजीत संयुक्तिक ख्रिसमस कार्यक्रम शहरातील विविध चर्चच्या धर्मगुरूंच्या उपस्थितीत बिशप डेरेक फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली धार्मिकतेने उत्साहात पार …

Read More »

बेळगावात विविध मागण्यांसाठी अभाविपचे आंदोलन

  बेळगाव : विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, शिष्यवृत्तीच्या वितरणात होणारा भेदभाव थांबवावा आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अधिक बस सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्यांसाठी आज बेळगावमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) वतीने आंदोलन करण्यात आले. आज बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकात विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या …

Read More »

कचरावाहू वाहन पडले कालव्यात; चालकाला जलसमाधी

  बेळगाव : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कचरा टाकणारे वाहन कालव्यात पडले व चालकाचा जागीच मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी शहराच्या हद्दीत पालिकेच्या कचरावाहू वाहनाचे नियंत्रण सुटून मलप्रभा नदीच्या डाव्या बाजूला असलेल्या बाळेकुंदर्गी कालव्यात पडून अपघात झाला. या अपघातात कचरावाहू वाहनाचा चालक 48 वर्षीय गदिगेप्पा कामन्नवर याचा जागीच मृत्यू …

Read More »

बाळंतीण व नवजात शिशुंच्या मृत्यूंबद्दल काँग्रेस सरकारवर भाजपचा हल्लाबोल

  बेळगाव : बाळंतीण व नवजात शिशुंच्या मृत्यूंबद्दल भाजप महिला मोर्चाने भव्य आंदोलन छेडून राज्य सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करत सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. कर्नाटक राज्यातील बाळंतीण व नवजात शिशुंच्या मृत्यूंबद्दल भाजप महिला मोर्चाने काँग्रेस सरकारच्या निष्क्रियतेवर तीव्र …

Read More »

येळ्ळूर येथे राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा 22 डिसेंबरला

  येळ्ळूर : 865 सीमावासीय शिक्षक महाराष्ट्र राज्य मंचच्या वतीने होणाऱ्या राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेच्या नियोजनाची बैठक येळ्ळूर येथे नुकतीच पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता उघाडे यांनी केले. 865 सीमावासीय गावातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांची परिस्थिती बघता त्यांना योग्य …

Read More »