Wednesday , December 17 2025
Breaking News

LOCAL NEWS

कोविड घोटाळा प्रकरणी पहिले एफआयआर दाखल

  एफआयआरमध्ये कोणत्याही राजकीय व्यक्तीचे नाव नाही बंगळूर : कर्नाटकातील कोविड-१९ साथीच्या आजाराच्या व्यवस्थापनात कथित घोटाळा आणि अनियमिततेशी संबंधित पहिला गुन्हा शुक्रवारी (१३) विधानसौध पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला. विधानसौध पोलिसांनी खासगी कंपन्यांचे मालक आणि वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. विद्यमान मुख्य वित्तीय अधिकारी, वैद्यकीय शिक्षण संचालनालय एम. विष्णू …

Read More »

पायोनियर बँकेत आज निवडणूक : सत्ताधारी पॅनलला विजयाची खात्री

  बेळगाव : येथील पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक रविवार दि. 15 डिसेंबर रोजी बी के मॉडेल हायस्कूलमध्ये होत आहे. या निवडणुकीत विद्यमान पॅनल प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास पायोनियर बँकेचे विद्यमान चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर यांनी व्यक्त केला आहे. 2020 साली बिनविरोध निवडून आलेल्या संचालक …

Read More »

अबकारी खटल्यातून दोघांची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नंदीहळ्ळी येथील घटनेत अबकारी खटल्यातुन आरोपींची सबळ पुराव्या अभावी व साक्षिदारातील विसंगतीमुळे येथील तिसरे जे. एम. एफ. सी न्यायालयाचे न्यायाधीशानी आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. 1) संतोष रायाप्पा चौगुले वय 24 वर्षे, धंदा शेती, राहणार शिवाजी नगर, नंदीहळ्ळी, ता. जि. बेळगांव 2) रायाप्पा शिवाजी चौगुले …

Read More »

युनायटेड ख्रिश्चन ख्रिसमस सेलिब्रेशनचे आज आयोजन

  बेळगाव : ऑल कर्नाटक युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्युमन राइट्स कमिशन फॉर इक्यूमेनिझम आणि सेंट्रल मेथोडिस्ट चर्च बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दि. 15 डिसेंबर रोजी युनायटेड ख्रिश्चन ख्रिसमस सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले आहे. मेथोडिस्ट चर्च येथे संध्याकाळी 6 वाजता या उत्सवाला सुरुवात होईल. बेळगावचे बिशप मोस्ट रेव्ह …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ नागपूर हिवाळी अधिवेशनात धडकणार!

  बेळगाव : नागपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्नी पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ व कार्यकर्ते दि. 17 डिसेंबर रोजी नागपूरला धडकणार आहे. महाराष्ट्र मागील तीन वर्षात आपल्याच सत्ता संघर्षात अडकून पडला होता. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे सीमालढ्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मात्र सध्या महाराष्ट्राला एक स्थिर सरकार मिळाले …

Read More »

सौंदत्ती रेणुका यल्लम्मा भक्तांसाठी खुशखबर; विशेष बससेवा सुरू

  बेळगाव : वायव्य मार्ग परिवहन महामंडळाने सौंदत्ती रेणुका यल्लम्मा भक्तांसाठी विशेष बसची व्यवस्था केली आहे. हुबळी ते बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील रेणुका यल्लम्मा या मार्गासाठी विशेष बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बसेस हुबळी ते यल्लम्मा डोंगरावर मंगळवार व शुक्रवारी उद्या पौर्णिमा आणि अमावस्येपर्यंत धावणार असून जनतेने …

Read More »

तालुका समितीचे ज्येष्ठ नेते कृष्णा हुंदरे यांचे निधन

  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, माजी तालुका पंचायत सदस्य कृष्णा ना. हुंदरे (वय 70) रा. हंगरगा यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 5 विवाहित मुली, एक मुलगा, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार रविवारी दुपारी 12 वाजता हंगरगा येथे होणार आहे. बेळगाव तालुका …

Read More »

नवजात मुलीला हॉस्पिटलमध्ये सोडून पळून गेलेल्या निर्दयी मातेची रवानगी कारागृहात

  बेळगाव : प्रसूतीनंतर आपल्या नवजात मुलीला हॉस्पिटलमध्ये सोडून पळून गेलेल्या निर्दयी मातेला पोलिसांनी अटक केली असून तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. बैलहोंगल येथील महिला बिबीजान सद्दाम हुसैन सय्यद ही महिला प्रसूतीसाठी 8-12-2024 रोजी बिम्स रुग्णालयात दाखल झाली होती. तिने मुलीला जन्म दिला. मात्र आपल्या नवजात शिशूची कोणतीही …

Read More »

शेतजमीन परस्पर हडप, तिघा भावांवर फसवणुकीचा गुन्हा

  मदभावी येथील प्रकरण : बनावट कागदपत्रे तयार करत परस्पर 13 एकरवर जमीन लाटली बेळगाव : बनावट कागदपत्रे तयार करून तिघा भावांची जमीन परस्पर नावावर करून घेत हडप केल्याप्रकरणी तिघा भावांवर गुन्हा दाखल झाला आहे. मदभावी (ता. अथणी) गावच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणाची अथणी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. गुन्हा …

Read More »

क्षयरोगमुक्त भारत निर्माण करूया : संजीवीनी फौंडेशनचे सीईओ मदन बामणे

  क्षयरोगमुक्त भारत या केंद्र सरकारच्या मोहिमेची संजीवीनी फौंडेशन येथून सुरुवात बेळगाव : क्षयरोग निर्मूलनासाठी भारत सरकारने १०० दिवसांची “क्षयरोग मुक्त भारत’ ही मोहीम सुरू केली असून प्रत्येक भारतीयांने यात सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करून “क्षयरोगमुक्त भारत” निर्माण करूया असे उदगार संजीवीनी फौंडेशनचे सीईओ मदन बामणे यांनी काढले. आरोग्य …

Read More »