Wednesday , December 17 2025
Breaking News

LOCAL NEWS

श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ नोकर पत्तीन सहकार संघाचे उद्घाटन

  बेळगाव : सहकारातून सर्वसामान्य माणसांचे जीवन उंचावता येते. त्यासाठी या क्षेत्रात काम करत असताना विश्वास आणि पारदर्शकता हवी. हा संघ शिक्षकांचा असून येथे विश्वास आणि पारदर्शकपणा हा मुळापासूनच असल्याने संघाची भरभराट नक्की होईल, असे खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सांगितले. ते येळ्ळूर येथे श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ नोकर पत्तीन …

Read More »

राजहंसगड येथील वॉर्ड सभा रद्द….

  बेळगाव : राजहंसगड येथील वॉर्ड सभा आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रद्द केली. गावातील विविध विषय, त्याचबरोबर गावातील समस्यावर चर्चा करण्यासाठी सकाळी गावात दवंडी देऊन वॉर्ड सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी ग्राम पंचायत विकास अधिकारी, ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्य हजर होते. वॉर्ड सभेला सुरवात होताच येथील नागरिकांनी ३२ गुंठे जमीनीच्या …

Read More »

साठे प्रबोधिनीतर्फे आपले संविधान चर्चा सत्राचे आयोजन

    बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी बुधवार दिनांक ११ डिसेंबर रोजी एकदिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चा सत्राच्या सुरुवातीला कर्नाटकाचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर …

Read More »

जिजामाता महिला सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध!

    बेळगाव : कर्नाटकातील पहिली महिला सहकारी बँक म्हणून सहकार क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जिजामाता महिला सहकारी बँकेची २०२५-३० या कालावधीसाठी निवडणूक बिनविरोध पार पडली. नव्याने चार संचालकांचा समावेश करण्यात आला. बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार इच्छुकांनी अर्ज दाखल केले. परंतु अर्ज माघारी दिवशी बिनविरोध निवड जाहीर …

Read More »

सेंट झेवियर्स स्कूल संघाने पटकाविला सलग तिसऱ्यांदा फिनिक्स चषक

  बेळगाव : फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिल आयोजित 12 वी फिनिक्स चषक 17 वर्षाखालील माध्यमिक आंतरशालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद सेंट झेवियर्स स्कूल संघाने सलग तिसऱ्यांदा पटकावत हॅट्रिक केली. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सेंट झेवियर्स स्कूल संघाने पोतदार इंटरनॅशनल स्कूल संघाचा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात ईशान घाटगे याने नोंदविलेल्या एकमेव विजय …

Read More »

खानापूर नविन बस स्थानकावरील गणेश हाॅटेलचे उद्घाटन

  खानापूर : खानापूर जांबोटी क्राॅसवरील नविन बसस्थानकात गणेश हाॅटेलचे उद्घाटन माजी आमदार व एआयसीसी सेक्रेटरी डाॅ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नुतन बसस्थानकात नव्याने सुरू करण्यात आलेल्या गणेश हाॅटेलचे उद्घाटन माजी आमदार व एआयसीसी …

Read More »

सतीश क्लासिक राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन

  बेळगाव : सतीश जारकीहोळी फाउंडेशन यांच्यावतीने 11 व्या सतीश क्लासिक 2024 राज्य आणि जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 16 डिसेंबर रोजी आरडी हायस्कूल ग्राउंड चिकोडी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून सतीश जारकीहोळी यांच्या माध्यमातून राज्य आणि जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन …

Read More »

53 वा वार्षिक अय्यप्पा स्वामी महोत्सव 22 डिसेंबरपासून

  बेळगाव : श्री अय्यप्पा सेवा समिती ट्रस्ट, आश्रय कॉलनी नानावाडी, बेळगाव यांच्यावतीने 53 वा वार्षिक श्री अय्यप्पा पूजा महोत्सव येत्या 22 डिसेंबर पासून 29 डिसेंबर पर्यंत साजरा होत आहे अशी माहिती या महोत्सव कमिटीचे अध्यक्ष श्री. एन. सी. आईल यांनी दिली. या महोत्सवाबाबतची माहिती देताना ते म्हणाले की, 22 …

Read More »

निवृत्त शिक्षक अशोक अनगोळकर यांचे निधन

  बेळगाव : मूळचे गोंधळी गल्ली व सध्या शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथील रहिवासी आणि मराठा मंडळ हायस्कूलचे निवृत्त शिक्षक अशोक आप्पाजी अनगोळकर (वय ८६) यांचे आज बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. उद्या गुरुवारी सकाळी ९ वाजता सदाशिवनगर येथे …

Read More »

दोन दिवसीय आंतरशालेय वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महोत्सव “रेजोनन्स” मोठ्या उत्साहात संपन्न

  बेळगाव : एस के ई सोसायटी संचलित जी एस एस पदवीपूर्व महाविद्यालय बेळगाव येथे (दिनांक 7 व 9 डिसेंबर 2024) महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दोन दिवसीय आंतरशालेय वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महोत्सव “रेजोनन्स”चा निरोप (सांगता) समारंभाचे आयोजन आज रोजी करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे कर्नल चंद्रनील पी रामणाथकर (एम एल आय …

Read More »