Wednesday , December 17 2025
Breaking News

LOCAL NEWS

पायोनियर बँक निवडणूक चौघांची बिनविरोध निवड

  बेळगाव : येथील सर्वात जुन्या असलेल्या दि. पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या 15 डिसेंबर रोजी होणार आहे. एकंदर 988 पात्र सभासद मतदान करणार असून 13 जागा पैकी चार राखीव गटातून बिनविरोध उमेदवार निवडून आले असल्याने फक्त सामान्य आणि महिला अशा दोन गटात ही निवडणूक होणार …

Read More »

महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर धर्मवीर संभाजी चौकात चोख पोलीस बंदोबस्त!

  बेळगाव : आजपासून सुरू होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने धर्मवीर संभाजी चौकात सकाळी अकरा वाजता महामेळाव्याचे आयोजन केले आहे. सकाळ पासूनच धर्मवीर संभाजी चौक येथे पोलीस आयुक्त मोठ्या या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने फौज फाट्यासह चोख बंदोबस्त ठेवला असून पोलीस आयुक्त स्वतः उपस्थित आहेत. समितीच्या महामेळाव्याचा धसका …

Read More »

म. ए. समितीच्या नेत्यांना भेटायला बेळगावला जाणार : शिवसेना नेते उदय सामंत

  मुंबई : बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी दिलेली नाही. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी घातली आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत चांगलेच भडकलेत. उदय सामंत यांनी काँग्रेसला हा वाद सोडवायचा नाही, अशी टीका केली. मराठींवर होणाऱ्या अन्यायाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे …

Read More »

युवकांना प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व हरपले; कै. बाबासाहेब भेकणे यांना श्रद्धांजली

  बेळगाव : वेदांत सोसायटी आणि मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच बेळगाव शहर आणि तालुक्यातील विविध संघ संस्थांशी संलग्न राहून कार्यरत असलेले कै. बाबासाहेब निंगाप्पा भेकणे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनानिमित्त आज भारत नगर येथील वेदांत सोसायटी कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेब भेकणे …

Read More »

अटक होण्याची आम्हाला पर्वा नाही, आम्ही उद्या महामेळावा घेऊच : समिती नेत्यांचा निर्धार

  बेळगाव : कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून बेळगावातील सुवर्ण सौध येथे सुरू होणार आहे. याउलट दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र एकीकरण समितीने परवानगीशिवाय महामेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. टिळकवाडी येथील वॅक्सीन डेपो मैदानावर जाऊन समिती नेत्यांनी मेळाव्याबाबत चर्चा केली. आम्हाला परवानगी मिळो की नाही. महाराष्ट्र सरकारला साथ द्या.पण आम्ही बेळगावचे …

Read More »

विधानसभा सभापतींकडून अधिवेशन तयारीची पाहणी

  बेळगाव : बेळगाव येथे 9 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान विधिमंडळ अधिवेशन पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात आपले विचार मांडले. उद्यापासून कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज रविवारी दुपारी यु. टी. खादर यांनी सुवर्णसौधला भेट देऊन तेथील अधिवेशन …

Read More »

“समाजसेविकेच्या” मदतीमुळे मिळाला चिमुकलीला आधार!

  समाजसेविका माधुरी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुकास्पद कार्य बेळगाव / माधुरी जाधव (प्रतिनिधी) : आजचे जग स्वार्थाने बरबटलेले आहे.मदत करणे तर दूरच पण कोणीही कोणाच्या अध्यात – मध्यात पडत नाही. अशाही परिस्थितीत माणुसकी कुठेतरी शिल्लक असल्याचा प्रत्यय शनिवार (दि. ७ डिसेंबर) रोजी आला. केएलई रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सानवी …

Read More »

संविधानाने दिलेल्या हक्क आणि अधिकारापासून सीमा बांधव वंचित?

  बेळगाव : अधिकार हक्क, स्वातंत्र्य जबाबदारी, सार्वभौमत्व, बंधुत्व ही तत्वे भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला प्रदान केली आहेत. मग मागील 68 वर्षापासून लढा देत असलेल्या बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांच्या तत्त्वांची मात्र गळचेपी सुरू आहे. कायदेशीर मार्गाने सुरू असणारा लढा लढण्यासाठी मज्जाव करत कर्नाटक सरकार अत्याचाराची परिसीमा गाठत आहे. होय “अत्याचाराची …

Read More »

मार्कंडेयनगर येथील स्वयंभू श्री वरदविनायक मंदिराचे कळसारोहण व धनलक्ष्मी – सरस्वती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

  बेळगाव : मार्कंडेयनगर ए.पी.एम.सी. बेळगांव येथील स्वयंभू श्री वरदविनायक मंदिराचे कळसारोहण व धनलक्ष्मी – सरस्वती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दि. 6/12/2024 रोजी करण्यात आली. बऱ्याच वर्षांनी आलेला दुर्मिळ मुहुर्त मार्गशीर्ष शुक्लपक्ष क्रोधीसंवस्तर 1946 श्रवण नक्षत्रमध्ये कारंजीमठ बेळगांवचे म.नि.प्र. गुरुसिध्ध महास्वामीजी यांच्या हस्ते कळसारोहण व प्राणप्रतिष्ठापना पार पडली. पौरोहित्य बैलहोंगल दुर्गा परमेश्वरी …

Read More »

महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भव्य भगवी रॅली

  कोल्हापूर : महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भव्य भगवी रॅली कोल्हापूर ते बेळगाव निघणार आहे. कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या महामेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी कोल्हापूर ते बेळगाव रॅलीचे …

Read More »