Wednesday , December 17 2025
Breaking News

LOCAL NEWS

बेळगावातील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणीसंग्रहालयातील वाघिणीचा मृत्यू

  बेळगाव : बेळगावातील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणीसंग्रहालयातील वाघिणीचा आज सकाळी मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे मृत्यू झाला आहे. मायकोप्लाझ्मा, सायटॉक्सझोनोसिस आणि बेबेसिओसिस नावाच्या दुर्मिळ आजाराने वाघीण ग्रस्त होती . गेल्या २१ दिवसांपासून वन्यजीव डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शौर्यवर प्राणिसंग्रहालयात उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी ९.४० वाजता अकार्यक्षम उपचारांमुळे तिचा मृत्यू झाला, …

Read More »

कागवाड येथे भीषण रस्ता अपघातात दाम्पत्याचा मृत्यू

  कागवाड : तालुक्यातील मंगळसुळी ऐनापूर रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचे वळणावर नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दाम्पत्याचा मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील कराविर तालुक्यातील कोटेरा गावातील आदर्श युवराज पांडव (वय 27) आणि शिवानी आदर्श पांडव (वय 20) यांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले …

Read More »

संजीवीनी फौंडेशनमध्ये ११११ दिव्यांची आरास करून साजरा केला दीपोत्सव

  बेळगाव : आदर्शनगर येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये आज दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आज फौंडेशन परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती तसेच आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. सायंकाळी सहा वाजता श्री परमज्योति अम्माभगवानांच्या पादुकांचा पुष्पाभिषेक करून महाआरती करण्यात आली त्यानंतर दीपोत्सव कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी मंदिर परिसर …

Read More »

भाषिक अल्पसंख्यांक कार्यालयातील सेवानिवृत्त अधिकारी वासुदेव भट यांचे निधन

  बेळगाव : भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो मधून सेवानिवृत्त झालेले एक ज्येष्ठ अधिकारी श्री. वासुदेव भट यांचे अलीकडेच बेळगाव मुक्कामी दुःखद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 80 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी डॉक्टर शारदा आचार्य, एक चिरंजीव व एक कन्या असा परिवार आहे. बेळगाव येथील किल्ल्यामध्ये पूर्वी असलेल्या …

Read More »

सोने चोरी करणाऱ्या आरोपींना अटक : यमकनमर्डी पोलिसांची कारवाई

  बेळगाव : यमकनमर्डी पोलिसांनी दोन ठिकाणी झालेल्या सोने चोरीच्या घटनांचा उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ५५ ग्राम सोने जप्त करण्यात आले आहे. यमकनमर्डी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या सोने चोरीच्या घटनांची उकल केली आहे. हुक्केरी तालुक्यातील इस्लामपूर येथील अडिवेप्पा लागमप्पा बागराई यांचे ३० ग्राम सोने चोरीला गेले …

Read More »

‘वक्फ’ला विवाह प्रमाणपत्र देण्याच्या आदेशाला स्थगिती : उच्च न्यायालयाचा आदेश

  बंगळूर : कर्नाटक राज्य वक्फ मंडळाला मुस्लिम अर्जदारांना विवाह प्रमाणपत्र जारी करण्याची परवानगी देणाऱ्या सरकारी आदेशास, अंतरिम आदेशात, कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी सात जानेवारी २०२५ पर्यंत स्थगिती दिली. एका जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया आणि न्यायमूर्ती के. व्ही. अरविंद यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. “सशक्त प्रथमदर्शनी प्रकरण …

Read More »

श्री ज्योतिबा मंदिर शिवबसव नगर बेळगाव यांच्या वतीने रविवारी दीपोत्सव

    बेळगाव : श्री ज्योतिबा मंदिर शिवबसव नगर बेळगाव यांच्या वतीने रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 11 हजार दिप लावण्याची संकल्पना करण्यात आली असून सकाळी 7 वाजता अभिषेक व विशेष पूजेने दीपोत्सवास सुरुवात होणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता दीप लावण्यास प्रारंभ होईल. त्यानंतर …

Read More »

रुद्रण्णा यडवण्णावर आत्महत्येप्रकरणी तपासाला गती

  बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयात आत्महत्या केलेल्या एसडीए कर्मचारी रुद्रण्णा यडवण्णावर यांच्या प्रकरणात अनेक खुलासे पुढे आले असून निनावी पत्र आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एसडीए कर्मचारी रुद्रण्णा यडवण्णावर यांच्या आत्महत्येप्रकरणी तहसीलदार बसवराज नागराळ आणि चालक अशोक कब्बलिगेर यांची सखोल चौकशी सुरू आहे. …

Read More »

पत्नीकडून सुपारी देऊन पतीचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड

  बेळगाव : बैलहोंगलच्या वण्णूर येथील युवकाच्या खुनाचा उलगडा झाला असून त्याच्या पत्नीनेच दीड लाखाची सुपारी देऊन पतीचा काटा काढला असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी नेसरगी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. बेळगावात शुक्रवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना …

Read More »

“आपली जमीन – आपला हक्क” : वक्फ विरोधात बेळगावमध्ये भाजपचे आंदोलन

  बेळगाव : वक्फ मंडळ रद्द करण्याच्या मागणीसाठी बेळगावमध्ये भाजपने “आपली जमीन – आपला हक्क” आंदोलनाअंतर्गत भव्य रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी काँग्रेस सरकारच्या धोरणांवर रोष व्यक्त करताना वक्फ मंडळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. वक्फ मंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत बेळगाव शहरातील सरदार …

Read More »