Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगावातील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणीसंग्रहालयातील वाघिणीचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणीसंग्रहालयातील वाघिणीचा आज सकाळी मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे मृत्यू झाला आहे.

मायकोप्लाझ्मा, सायटॉक्सझोनोसिस आणि बेबेसिओसिस नावाच्या दुर्मिळ आजाराने वाघीण ग्रस्त होती . गेल्या २१ दिवसांपासून वन्यजीव डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शौर्यवर प्राणिसंग्रहालयात उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी ९.४० वाजता अकार्यक्षम उपचारांमुळे तिचा मृत्यू झाला, असे वन उपवनसंरक्षक मारिया क्रिस्तू राजा यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

शवविच्छेदनानंतर केंद्र सरकारच्या निकषानुसार शौर्य हिच्यावर प्राणिसंग्रहालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्राणिसंग्रहालयाच्या कार्यकारी संचालक मारिया क्रिस्तू राजा, सहायक वनसंरक्षक नागराज बलेहोसूरा, विभागीय वन अधिकारी पवन कुरणिंगा प्राणिसंग्रहालयाचे डॉक्टर डॉ. नागेश हुइलागोला, पशुवैद्यकीय विभागाचे डॉक्टर डॉ. प्रशांत कांबळे व प्राणिसंग्रहालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *