हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी सुधाताई माने तर उपाध्यक्षपदी मल्लाप्पा खोत यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, पंचायत सदस्य आनंद शेंडे, रविंद्र शेलार, पवन पाटील, विनोद कांबळे, प्रकाश हालट्टी, सीमा कांबळे, सुमन सुतार, संजय नाईक, प्रकाश मगदूम, मल्लिकार्जुन वटारे, उत्तम बोरे, रघुनाथ भोसले, काशिनाथ शेलार सह पंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते.