Sunday , June 7 2026
Breaking News

सुट्टीवर आलेल्या जवानाची तलावात उडी घेऊन आत्महत्या..

Spread the love

 

बेळगाव : भारतीय सैन्य दलात सेवा बजावण्याऱ्या आणि सुट्टीवर आपल्या गावी आलेल्या जवानाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना कित्तूर तालुक्यातील परसनट्टी गावात उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील परसनट्टी गावचे रहिवासी नरेश यल्लप्पा आगसार (२८) हे सुट्टीवर आपल्या गावी आले होते. कौटुंबिक वादाने त्रस्त जवानाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

कित्तूर तालुक्यातील देगांव येथील रहिवासी नरेश यल्लप्पा आगसार हे गेल्या पाच वर्षांपासून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते.. २० दिवसांपूर्वी सुट्टीनिमित्त ते आपल्या गावी आले होते. मात्र, काल पुन्हा सेवेवर रुजू होण्यासाठी परतणार असल्याचे सांगून घरातून बाहेर पडून कित्तूर तालुक्यातील परसनट्टी तलावात उडी घेत आत्महत्या केल्याचे वृत्त समजते आहे. घटनेची माहिती मिळताच कित्तूर पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रविण गंगोळ व प्रविण कोटी आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. यावेळी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा शोध घेतला असून, काल सायंकाळपासून तलावात शोधमोहीम राबवली जात आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पुन्हा एलपीजी सिलिंडर दरवाढ; केंद्राच्या महागाई धोरणावर लक्ष्मी हेब्बाळकर यांचा हल्लाबोल

Spread the love  बेळगाव : घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा २९ रुपयांची वाढ केल्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *