बेंगळुरू : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबीयांच्या सिद्धार्थ विहार ट्रस्टला देण्यात आलेली पाच एकर जमीन कर्नाटक सरकारला परत करण्याचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा राहुल एम. खरगे यांनी घेतला आहे. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (मुडा) घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान राहुल यांनी हे पाऊल उचलले आहे. ही पाच एकर …
Read More »LOCAL NEWS
सौंदत्ती येथे विविध कामांचा शुभारंभ!
बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज सौंदत्ती येथील रेणुका देवीचे दर्शन घेतले. जमीन घोटाळा प्रकरणी सिद्धरामय्या अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांनी आज रविवारी रेणुका देवीचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. यावेळी त्यांनी रेणुका देवी देवस्थान परिसरात विविध विकासकामांचे उद्घाटनही केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या …
Read More »तीन लाखाचा विनापरवाना दारू साठा जप्त
बेळगाव : गोव्याहून हावेरीला विनापरवाना दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनासह एकूण तीन लाख 19 हजाराचा मद्यसाठा जप्त करण्याची कारवाई अबकारी विभागाने रविवारी सकाळी केली. जमील निजामुद्दीन शिरहट्टी (वय48) रा. हावेरी तालुका हावनूर असे या कारवाईत अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. अनमोड चेक पोस्ट नाक्यावर अबकारी विभागाने हे वाहन अडवून …
Read More »पायोनियर अर्बन बँकेच्या कणबर्गी शाखेचे उद्घाटन संपन्न
बेळगाव : “एखादी बँक 118 वर्षे वाटचाल करते म्हणजेच ती आपल्या ग्राहकांच्या पैशांची किती काळजी घेते ते दिसून येते. पायोनियर अर्बन बँकेच्या आजवरच्या सर्वच चेअरमन आणि संचालकांनी जनतेच्या पैशाची काळजी घेतली आहे. बँकेतील पैसा इतरत्र ठिकाणी वापरलेला नाही आणि म्हणूनच या बँकेने चांगली प्रगती केली आहे. याही पुढे ही …
Read More »कडोली साहित्य संमेलन 19 जानेवारीला
कडोली : येथील मराठी साहित्य संघातर्फे होणारे 40 वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 19 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. यापूर्वी 5 जानेवारी ही संमेलनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र याच तारखेला येळळूर साहित्य संमेलनही जाहीर करण्यात आले. त्यामुळे समन्वय साधत 5 जानेवारी ऐवजी 19 जानेवारीला संमेलन …
Read More »श्री दुर्गामाता दौडीची उत्साहात सांगता
बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज विजयदशमीच्या मुहूर्तावर श्री दुर्गामाता दौडीची सांगता करण्यात आली. प्रारंभी मारुती मंदिर मारुती गल्ली येथे भल्या पहाटे धारकरी फेटा बांधून घेण्यास रांगेत उत्साहाने उपस्थित होते. यावेळी मारुती मंदिर येथे प्रमुख पाहुणे म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचे अकरावी वंशज ह. भ. प. श्री …
Read More »शहापूरमधील श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
बेळगाव : बेळगावातील आणि शहापूरमधील श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. गेल्या अनेक वर्षापासून ही रथोत्सवाची परंपरा सुरू आहे. बेळगावातील श्री लक्ष्मी वेंकटेश मंदिराच्या रथोत्सवात शेकडो भाविक रथ ओढण्यासाठी सहभागी झाले होते. व्यंकट रमण गोविंदाचा गजर रथ ओढताना भक्त करत होते. शहरातील प्रमुख मार्गावर फिरून मंदिराकडे …
Read More »विश्वविख्यात म्हैसूर दसरा महोत्सवाची आज जंबो सवारीने सांगता
बंगळूर : जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा महोत्सवाच्या नेत्रदीपक जंबोसावरी मिरवणुकीला आज (१२ ऑगस्ट) सुरुवात होणार आहे. ऐतिहासिक विजयादशमीच्या मुहूर्तावर काढण्यात येणारी जंबो सवारीच्या मिरवणुकीचा शुभारंभ म्हैसूर पॅलेसच्या आवारात सुवर्ण अंबरीत सर्वांलंकार परिधान करून विराजमान झालेल्या श्रीचामुंडेश्वरी देवीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात येईल. शनिवारी दुपारी ४ ते ४-३० दरम्यान मुख्यमंत्री …
Read More »आयटी कंपन्यानाही लाल-पिवळा फडकावण्याची सक्ती
बंगळूर : यावर्षी १ नोव्हेंबर रोजी ५० वा कन्नड राज्योत्सव भव्य पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सर्व शाळा, महाविद्यालये, कारखाने आणि आयटीबीटी कार्यालयांमध्ये लाल-पिवळा (कन्नड) ध्वज अनिवार्यपणे फडकवण्याचे आदेश दिले आहेत. बंगळुरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, एक नोव्हेंबर हा कर्नाटकसाठी महत्त्वाचा आहे. …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीस मध्यवर्ती घटक समितीच्या सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. दीपक दळवी व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta