Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

केएसआरटीसी बससेवा उद्यापासून बंद?

  परिवहन कर्मचारी संपाच्या तयारीत बंगळूर : कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनाची अंमलबजावणी, वेतनाची थकबाकी आणि महामंडळांची शक्ती योजनेची थकबाकी या मागण्यांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी मंगळवार (ता.३१) पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. बंगळुर, कोलार, शिमोगा, विजापूर, चिक्कबळ्ळापूरसह अनेक जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला असून अनेक ठिकाणी वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता …

Read More »

नागेश मडिवाळ ठरला “मिस्टर बेळगाव”चा मानकरी!

  बेळगाव : रुद्र जिमच्या नागेश मडिवाळने आपल्या पिळदार शरीरयष्टीचा दर्शन घडवत “मिस्टर बेळगाव 2024” चॅम्पियन चॅम्पियन हा किताब पटकावला. शनिवारी रात्री बेळगाव शहरातील छत्रपती संभाजी उद्यान येथे बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले. बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने संभाजी उद्यानात या स्पर्धेचे आयोजन …

Read More »

विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विषयातील गुण वाढीसाठी व्याख्यानमाला उपयुक्त : मदन बामणे

  कै. एम. डी. चौगुले दहावी व्याख्यानमालेस सुरुवात बेळगाव : वर्षभर त्या त्या शाळेच्या शिक्षकांकडून वेगवेगळ्या विषयांचे अध्ययन केले जाते पण तज्ञ शिक्षकांच्या सहकार्याने आयोजित व्याख्यानमालेंमुळे विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये वाढ होण्यासाठी मदत होते, असे विचार युवा नेते मदन बामणे यांनी मांडले. कलमेश्वर हायस्कूल मण्णूर येथे कै. एम. डी. चौगुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून …

Read More »

“सन्मित्र”चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात

  बेळगाव : येळ्ळूर ता. बेळगांव येथील सन्मित्र मल्टिपर्पज को- ऑप. सोसायटीच्या वतीने २०२५ सालाकरीता छापलेल्या नवीन दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा श्री चांगळेश्वरी ‌मंदिर येथे चेअरमन राजकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून एसबीआय बँकचे निवृत्त अधिकारी श्री. अरुण नाईक हे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर सन्मित्रचे …

Read More »

युवा मेळाव्यास तालुका समितीचा पाठिंबा : अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर

  बेळगाव : युवा दिन साजरा करणे हे आजच्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचे कार्य आहे. कोणत्याही संघटनेत व समाजामध्ये एक चांगले कार्य करायचं असेल ते युवकांचा सहभाग हा असला पाहिजे. आणि एक चांगल्या विचारांचे युवक समाजामध्ये कार्य करत असतील तर त्या समाजाचा सर्वांगीण विकास होत असतो, यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या …

Read More »

लक्ष्मण होनगेकरांच्या विजयामुळे बेळगाव तालुका समितीच्या विजयी पर्वाची सुरुवात

  बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर बेळगाव : मराठा बँकेच्या निवडणुकीत लक्ष्मण होनगेकरांच्या विजयामुळे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची विजयी पर्वाची सुरुवात आता सुरू झाली आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने एकीने, निष्ठेने, नियोजनाने कार्य केल्यास यासारखे यश प्रत्येक निवडणुकीत मिळेल व समितीचा भगवा …

Read More »

सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा युवा समितीच्या बैठकीत निर्णय

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज युवा समिती कार्यालय, टिळकवाडी, बेळगाव येथे अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ४ जानेवारी २०२५ रोजी मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे संपन्न होणार असून सदर भव्य सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या सुरुवातीला भारताचे माजी …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कन्नड शासकीय प्राथमिक शाळा, मन्नूरला वॉटर प्युरिफायरची मदत

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांनी कन्नड शासकीय प्राथमिक शाळा, मन्नूर यांना वॉटर प्युरिफायरची मदत केले. हे उदार योगदान रो. आशा पोतादार यांच्याकडूून केले गेले. आदरणीय जिल्हा गव्हर्नर रो. शरद पै यांच्या हस्ते औपचारिकपणे सुपूर्द करण्यात आले. तसेच राज्यपाल रो. ॲड. महेश बेल्लद यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम …

Read More »

मच्छेत बाळगोपाळ एसएसएलसी व्याख्यानमाला

  बेळगाव : दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण असल्याने या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेचे तंत्र माहिती होणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने बाळगोपाळ कंपनीतर्फे दहावी विद्यार्थ्यांसाठी बाळगोपाळ एसएसएलसी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला दमशिमं संचलित व्ही. एस. पाटील हायस्कूल मच्छे येथे …

Read More »

भीषण रस्ता अपघात; हेस्कॉम इंजिनिअरच्या आईचा मृत्यू

  चिक्कोडी : निपाणी- मुधोळ राज्य महामार्गावर शनिवारी शासकीय बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात हेस्कॉम अधिकाऱ्याच्या आईचा मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग शहरातील निर्मला आवटे (६०) यांचा मृत्यू झाला. कार चालवत असलेले चिक्कोडी हेस्कॉमचे उपविभागीय सहाय्यक अभियंता नेमिनाथ आवटे (43) हे सुदैवाने बचावले. तो चिक्कोडी शहरातील यादव नगर …

Read More »