Sunday , September 20 2026
Breaking News

नागेश मडिवाळ ठरला “मिस्टर बेळगाव”चा मानकरी!

Spread the love

 

बेळगाव : रुद्र जिमच्या नागेश मडिवाळने आपल्या पिळदार शरीरयष्टीचा दर्शन घडवत “मिस्टर बेळगाव 2024” चॅम्पियन चॅम्पियन हा किताब पटकावला. शनिवारी रात्री बेळगाव शहरातील छत्रपती संभाजी उद्यान येथे बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने संभाजी उद्यानात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते हजारो बॉडी बिल्डिंग शौकीन खेळाडूंच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. रुद्र जिमच्या रितिक पाटील ला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तर कार्पोरेशन जिम गोकाकचा बॉडी बिल्डर सागर कळळीमणी याने बेस्ट पोझरचा किताब पटकावला.

स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक आर. एम. चौगुले, उपमहापौर आनंद चव्हाण, आनंद अकनोजी, बसनगौडा पाटील, मदनकुमार भैरपनावर, महेश सातपुते, रवींद्र पाटील, राघवेंद्र पाटील, किशोर गवस, नगरसेवक गिरीश धोंगडी, नारायण चौगुले, अनिल अमरोळे, रणजीत चौगुले, शुभम कलघटगी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *