बेळगाव : बेळगाव शहरात वाढत्या डेंग्यूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर खासदार जगदीश शेट्टर यांनी बिम्स रुग्णालयात जाऊन डेंग्यूग्रस्त रुग्णाची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याचप्रमाणे डॉक्टरांकडून रुग्णांबद्दल माहिती घेतली. दररोज किती तापाचे रुग्ण येतात, त्यांना तुम्ही औषध कसे देत आहात, अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी बिम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांची बैठक घेऊन …
Read More »LOCAL NEWS
बेळगाव महापालिकेच्या चारही स्थायी समिती अध्यक्षांची निवड बिनविरोध
बेळगाव : बेळगाव महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांची निवडणूक आज शुक्रवार दि. ९ जुलै रोजी पार पडली. समितीमधील सदस्यांपैकी ४ भाजपचे सदस्य होते. त्यामुळे बिनविरोध निवडणूक झाली. ४ समित्यांच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या केवळ ४ सदस्यांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. अर्थ स्थायी समितीसाठी नेत्रावती भागवत, आरोग्य …
Read More »कै. सौ. सुवर्णाताई आर. मोदगेकर स्मृतिदिनानिमित्त शालेय साहित्याचे वितरण
बेळगाव : मराठा मंडळ संचलित बस्तवाड हायस्कूलमध्ये मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी १५वा कै.सौ. सुवर्णाताई मोदगेकर स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. गुंडू मंगो चौगुले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय के. खांडेकर यांनी केले. सुरुवातीला कै. सौ. सुवर्णाताई आर. मोदगेकर यांच्या फोटोचे …
Read More »महाराज असल्याच्या भावनेतून जनसेवा शक्य नाही
मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली ताकीद; डीसी, सीईओंच्या बैठकीत सक्त सूचना बंगळूर : जिल्हाधिकारी हे महाराज नसून लोकसेवक आहेत. महाराजांची भावना असेल तर विकास आणि प्रगती होणार नाही. राजकारणी आणि अधिकारी या दोघांनीही आपण जनतेचे सेवक आहोत हे लक्षात ठेवावे आणि जनतेची सेवा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. विधानसौधच्या …
Read More »पावसासाठी धुपटेश्वर (गौळदेव) मंदिरात गाऱ्हाणे
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे येथील कंग्राळ गल्ली शेतकरी संघ, कंग्राळ गल्ली पंच मंडळ, नागरिक आणि बेळगाव देवस्थान मंडळ यांच्या वतीने हनुमान नगर येथे धुपटेश्वर (गौळदेव) पूजा मोठ्या उत्साहात पार पडली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बेळगावच्या महापौर सौ. सरिता कांबळे, उपमहापौर श्री. आनंद चव्हाण, माजी आमदार श्री. अनिल बेनके, नगरसेवक श्री. …
Read More »केएलई मार्गावर झाड कोसळून ३ कारचे नुकसान
बेळगाव : मुसळधार पावसामुळे केएलई मार्गावरील भला मोठा वृक्ष उन्मळून पडून याठिकाणी पार्किंग करण्यात आलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी सायंकाळी बेळगावमधील केएलई रुग्णालय मार्गावर असणारे भले मोठे झाड मुसळधार पावसामुळे कोसळले. या भागात पार्किंग करण्यात आलेल्या तीन चारचाकी वाहनांवरच हे झाड कोसळल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. …
Read More »स्मार्ट सिटी विभागाकडे १०० मीटर गटार निर्मिती करण्यासाठी पैसे नाहीत?
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव महापालिका व्याप्तितील पाईपलाईन रोड विजयनगर येथील रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान ग्रामीण आमदार यांनी कामाचा शुभारंभ केला. कामाला सुरुवात केली. पण आज देखील काम पूर्णत्वास गेले नाही. पाईपलाईन रोड अत्यंत दुर्वस्थेत होता त्यामुळे मागच्या वर्षी रोडचा मध्यावर असलेला …
Read More »खासदार प्रियांका जारकीहोळी यांचे बेळगावात जोरदार स्वागत
बेळगाव : चिक्कोडी लोकसभा मतदार संघाच्या खासदारपदी निवडून आलेल्या प्रियांका जारकीहोळी यांचे खासदार झाल्यानंतर प्रथमच बेळगावात आगमन झाले. काँग्रेस जिल्हा कमिटीच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, आपल्या वडिलांनी दाखविलेल्या मार्गावर आपण चालत असून संविधानानुसार आपण सर्व कामकाज करण्यावर भर देत आहोत. संविधान वाचविण्यासासाठी …
Read More »श्री श्री वामनाश्रम स्वामींचा कार्यक्रम उत्साहात
बेळगाव : श्री संस्थान शांताश्रम काशी तथा हळदीपूर चे मठाधिपती श्री श्री वामनाश्रम स्वामीजी वैश्य समाज बांधवांना प्रबोधन करण्याकरिता शुक्रवार दिनांक ५ जुलै रोजी बेळगाव नगरीत गोवावेस येथील श्री चिदंबर राजाराम महाराज व पांडुरंग महाराज समाधी मंदिर शाखा मठ येथे वास्तव्याला आले होते. यावेळी श्री श्री वामनाश्रम स्वामीजी रविवार …
Read More »रोटरी दर्पणतर्फे मण्णूर गाव दत्तक
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण ही समाजसेवेसाठी सतत झटणारी संस्था आहे. समाज विकासाच्या कामात रोटरी दर्पणचे योगदान असते. शिक्षण, आरोग्य, कृषी, जलसंवर्धन, सामाजिक अशा विविध क्षेत्रात काम करत असून गरजू महिलांना सक्षम बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे उद्गार रोटरी क्लबचे प्रांतपाल शरद पै यांनी काढले. यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta