Sunday , July 26 2026
Breaking News

कै. सौ. सुवर्णाताई आर. मोदगेकर स्मृतिदिनानिमित्त शालेय साहित्याचे वितरण

Spread the love

 

बेळगाव : मराठा मंडळ संचलित बस्तवाड हायस्कूलमध्ये मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी १५वा कै.सौ. सुवर्णाताई मोदगेकर स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. गुंडू मंगो चौगुले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय के. खांडेकर यांनी केले. सुरुवातीला कै. सौ. सुवर्णाताई आर. मोदगेकर यांच्या फोटोचे पूजन श्री. गुंडू मंगो चौगुले व श्री. प्रकाश देसाई यांनी केले तर दिपप्रज्वलन एस.डी.एम.सी अध्यक्ष श्री. शिवाजी काकतकर व श्री. मनोहर काकतकर तसेच माजी जिल्हा पंचायत सदस्य व मराठा मंडळ विश्वस्त कमिटीचे उपाध्यक्ष श्री. आर. सी. मोदगेकर तसेच श्री. किरण आर. मोदगेकर व सर्व शिक्षकांनी केले. या कार्यक्रमाला उद्देशून अनेकांचे भाषणे झाली त्यामध्ये सुवर्णाताई मोदगेकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला तसेच आर. सी. मोदगेकर यांचा शिक्षण क्षेत्रामधील आढावा घेतला व बस्तवाड गावाशी त्यांची तळमळ व त्यांचे योगदान नमूद केले. याप्रसंगी श्री. प्रकाश देसाई, श्री. शिवाजी काकतकर, श्री. मनोहर काकतकर, आर. सी. मोदगेकर यांची भाषणे झाली. स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य व यावर्षी स्कूल बॅगचे वितरण करण्यात येते. तसेच शाळेच्या आवारामध्ये स्मृतीदिनानिमित्त वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील पालक वर्ग, शिक्षण प्रेमी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बी. बी. पाटील व आभार श्री. पी. बी. लोहार यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *