Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुने विद्युत खांब हटविले!

  बेळगाव : श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील रहदारीस अडथळे ठरणारे जुने विद्युत खांब त्याचप्रमाणे किर्लोस्कर रोडवरील एकूण सहा खांब सोमवारी हेस्कॉमकडून हटविण्यात आले. हेस्कॉम अधिकाऱ्यांनी आज स्वतः संभाजी चौकात उपस्थित राहून जेसीबीच्या सहाय्याने केळकर बाग कॉर्नर वरील जुना विद्युत खांब तसेच या ठिकाणी रदारीस …

Read More »

बेळवट्टी महालक्ष्मीतर्फे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांचा सत्कार

  बेळगाव : बेळवट्टी – बाकनूर येथील महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीच्या सतराव्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत ज्येष्ठ नागरिक व गुणी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी. बी. देसाई होते. संचालक रामलिंग देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केल्यानंतर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष लुमाण्णा नलावडे, नामदेव पाटील, शंकर देसाई, …

Read More »

उद्या बंगळूर, शुक्रवारी कर्नाटक बंद

  एकाच आठवड्यातील दोन बंदमुळे संभ्रम बंगळूर : कावेरी पाणी वाटप वादावर एकाच आठवड्यात दोन बंद पुकारण्यात आल्याने संघटना संभ्रमात आहेत. अनेक संघटनांनी उद्या (ता. २६) होणाऱ्या ‘बंगळूर बंद’ला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे, तर शुक्रवार दि. २९ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या ‘कर्नाटक बंद’लाच पाठिंबा दिला आहे. शुक्रवारी (ता. २९) …

Read More »

कावेरी प्रश्नी पंतप्रधान मोदीनी हस्तक्षेप करावा

  देवेगौडांचे पत्र; स्वतंत्र बाह्य एजन्सी नेमण्याची विनंती बंगळूर : कावेरीतील सर्व जलाशयांचा अभ्यास करण्यासाठी या वादात पक्षकार असलेली राज्ये आणि केंद्र सरकार यांच्यापासून स्वतंत्र अशी बाह्य एजन्सी नेमण्याचे निर्देश जलशक्ती मंत्रालयाला द्यावेत, असे आवाहन माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. देवेगौडा यांनी या …

Read More »

जिल्हास्तरीय दसरा हाॅकी क्रीडा स्पर्धेत जी. जी. चिटणीस विजयी

  बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, बेळगाव युवा सक्षमीकरण व क्रीडा विभाग, यांच्या संयुक्त आश्रयाने जिल्हास्तरीय दसरा हाॅकी क्रीडा स्पर्धांचे मेजर सय्यद हाॅकी मैदानावर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जी जी चिटणीस स्कूल, भंडारी स्कूल, सेंट जॉन, फिनिक्स स्कूलच्या क्रीडांपटूनी सहभाग घेतला होता. दसरा जिल्हा निवड चाचणी स्पर्धेमध्ये मुलांच्या …

Read More »

जायंट्स ग्रुप आयोजित गणेश मूर्ती व देखावा स्पर्धा निकाल

  बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश मूर्ती आणि उत्कृष्ट देखावा स्पर्धा घेण्यात आल्या. दक्षिण व उत्तर अशा दोन विभागात घेण्यात आलेल्या या स्पर्धांचा निकाल पुढील प्रमाणे आहे. दक्षिण विभाग श्री गणेश मूर्ती प्रथम : सार्व. गणेश उत्सव मंडळ बसवाण गल्ली, शहापूर. द्वितीय …

Read More »

नेताजी मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीची वार्षिक उलाढाल 68 कोटीवर

  चेअरमन डी. जी. पाटील- संस्थेची 23 वी सर्वसाधारण सभा संपन्न येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को -ऑप. सोसायटीची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीच्या सभागृहात अगदी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. प्रारंभी नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे …

Read More »

महापालिकेकडून विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी

  बेळगाव : अनंत चतुर्दशी जवळ आल्याने बेळगाव महापालिकेने विसर्जन मिरवणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरु केली आहे. पालिका आयुक्त अशोक दुडगंटी यांनी आज मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत श्री विसर्जन मिरवणूक मार्गाची पायी फिरून पाहणी केली आणि सर्व समस्या सोडवण्याचे आदेश अभियंत्यांना दिले. पालिका आयुक्त अशोक दुडगंटी यांनी आज, रविवारी आधी कपिलतीर्थ येथील …

Read More »

आंबेवाडीतील मुलांच्या खो-खो संघाचा जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश

  बेळगाव : बेळगाव ग्रामीणमधील आंबेवाडी गावातील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेतील मुलांच्या खो-खो संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. रामदुर्ग येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी आंबेवाडी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष चेतन पाटील व सागर सुतार यांनी खो-खो संघाला प्रोत्साहनात्मक म्हणून टी-शर्ट, पॅन्ट व जर्सी दिले तर बेळगाव ग्रामीण भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे …

Read More »

समर्थ नगर येथील एकदंत सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्याचे उद्घाटन

  बेळगाव : बेळगावचा एकदंत सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगाव यांच्या वतीने “कुंभकर्ण सारखा निद्रा अवस्थेत असलेले आपला हिंदु बांधव” ह्या देखाव्याचे उद्घाटन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष व समिती नेते श्री. रमाकांतदादा कोंडूसकर व डॉक्टर रवि पाटील यांच्या हस्ते फीत कापुन करण्यात आले. …

Read More »