Saturday , November 7 2026
Breaking News

विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुने विद्युत खांब हटविले!

Spread the love

 

बेळगाव : श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील रहदारीस अडथळे ठरणारे जुने विद्युत खांब त्याचप्रमाणे किर्लोस्कर रोडवरील एकूण सहा खांब सोमवारी हेस्कॉमकडून हटविण्यात आले.
हेस्कॉम अधिकाऱ्यांनी आज स्वतः संभाजी चौकात उपस्थित राहून जेसीबीच्या सहाय्याने केळकर बाग कॉर्नर वरील जुना विद्युत खांब तसेच या ठिकाणी रदारीस अडथळा ठरणारे अन्य खांब देखील हटविण्यात आले.

गणेश विसर्जन मिरवणुकीचा धर्मवीर संभाजी चौक किर्लोस्कर रोड हा मुख्य मार्ग असल्यामुळे केळकर बाग येथील कॉर्नरवरील खांब मिरवणुकीस अडथळा ठरणार होता. सदर खांब हटविण्यात यावा यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मागील महिनाभरापासून पाठपुरावा सुरू ठेवला होता याची दखल घेत हेस्कॉमने आज सकाळी सदर खांब जेसीबीच्या सहाय्याने दोरखंड बांधून हा खांब हटविण्यात आला त्यावेळी थोड्या वेळासाठी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता आणि काही काळासाठी ट्राफिक जाम झाला होता.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *