बेळगाव : उच्च न्यायालयाने आदेश बजावूनही सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे देण्याकडे दुर्लक्ष करून सापत्न वागणूक देणाऱ्या महापालिकेने आता व्यापारी आस्थापनांच्या नामफलकांचे कानडीकरण करण्याचा विडा उचलला आहे. दुकानांच्या नामफलकांवर ६० टक्के जागेत कन्नड भाषेत मजकूर लिहिण्यात यावा, असे पत्रक आयुक्त अशोक दुडगंटी यांनी काढले आहे. स्थानिक लोकांच्या भाषेत व्यवहार …
Read More »LOCAL NEWS
वर्क फ्रॉम होम, नॉट रिचेबल चालणार नाही
मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना इशारा; जनतेच्या समस्या प्रमाणिकपणे सोडविण्याच्या सूचना बंगळूर : जिल्हा आणि तालुका केंद्रातील अधिकाऱ्यांनी घरून काम करू नये, असे सांगून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून काम करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या. आज विधानसौध कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. …
Read More »पीओपी गणेशमूर्ती बनविणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा
मंत्री ईश्वर खांड्रे; अधिकाऱ्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा बंगळूर : पीओपी मूर्ती जलस्रोतांसाठी धोकादायक असल्याने अशा मूर्तींची निर्मिती, वाहतूक, विक्री आणि विल्हेवाट पूर्णपणे रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश वन, जीवशास्त्र आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खांड्रे यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणपती उत्सव …
Read More »बेळगाव नेहरुनगर येथील पेट्रोल पंपावर बर्निंग कार
बेळगाव : बेळगाव येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरताना एका कारने पेट घेतला आहे. पेट्रोल पंपाच्या आवारात कारच्या समोरील भागाला अचानक आग लागल्याने मोठा अनर्थ घडला असता. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नेहरुनगर येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आलेल्या स्वीफ्ट कारला आग लागली, कर्मचाऱ्यांनी आग विझवल्याने भीषण अपघात टळला. आग लागताचं तितक्यात …
Read More »मराठा मंडळ अध्यक्षपदी राजश्री नागराजु (हलगेकर) यांची फेरनिवड
बेळगाव : मराठा मंडळच्या नुतन अध्यक्षा म्हणून सौ. राजश्री नागराजु (हलगेकर) यांची तर उपाध्यक्षपदी विनायक बसवंतराव घसारी यांची एकमताने निवड झाली. कार्यकारिणी समितीची बैठक सोमवार दि. 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी श्री. नागेशराव एस. झंगरूचे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सौ. राजश्री नागराज यांनी गेली 18 वर्षे अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला असून त्यानी …
Read More »वास्को-निजामुद्दीन रेल्वेत सापडले 8 प्रवासी बेशुद्धावस्थेत; बेळगाव येथील रुग्णालयात दाखल
बेळगाव : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या वास्को-निजामुद्दीन रेल्वेतून प्रवास करणारे मध्य प्रदेशातील आठ प्रवासी बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोंढा स्थानक सोडल्यानंतर एकाच डब्यातून प्रवास करणाऱ्या आठ प्रवाशांना दोन वेळा उलट्या झाल्या. मग जे झोपले ते कधीच उठले नाहीत. सहप्रवासी जागे झाले पण त्यांनी …
Read More »‘जनता दला’चे नाव बदलून ‘कमल दल’ करा
काँग्रेसचे विडंबन; धजदची धर्मनिरपेक्षता संपवली बंगळूर : पक्षाऐवजी धर्मनिरपेक्षता विसर्जित! जनता दलाचे नाव बदलून ‘कमल दल’ असे सांगून भाजपसोबत युतीचा प्रस्ताव देणाऱ्या धजदवर काँग्रेसने जोरदार टीका केली. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने सोमवारी याबाबत ट्विट केले की, निवडणूक हरल्यानंतर पक्ष विसर्जित करण्याऐवजी त्यांनी धर्मनिरपेक्षता विसर्जित केली. त्यामुळे जनता दल या …
Read More »माझे प्रेतही भाजपात जाणार नाही : मुख्यमंत्री सिध्दरामय्या
दुष्काळी तालुक्यांची लवकरच घोषणा बंगळूर : माझे प्रेतही भाजपमध्ये सामील होणार नाही, असे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी आज स्पष्ट केले. सोमवारी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, माझी संपूर्ण राजकीय कारकीर्द जातीयवादी शक्तींच्या विरोधात गेली आहे आणि त्यामुळे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे विधान मजेदार आहे. सिद्धरामय्या …
Read More »निलजी येथील ब्रह्मलिंग मंदिर आणि नावगे गावच्या रामलिंग देवस्थानास आर. एम. चौगुले यांची भेट
बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील निलजी गावातील जागृत ब्रह्मलिंग मंदिर आणि नावगे गावाच्या रामलिंग देवस्थानाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. एम. चौगुले यांनी भेट दिली. श्रावण मासातील शेवटच्या सोमवार निमित्ताने तालुक्यातील विविध गावामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आर. एम. चौगुले यानी दोन्ही ठिकाणी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. …
Read More »श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्याबाबत विश्वकर्मा समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : श्री विश्वकर्मा जयंती येत्या 17 सप्टेंबरला असून राज्यात सरकारी कार्यालय वगैरे सर्व स्तरांवर ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जावी अशी मागणी श्री विश्वकर्मा जयंती उत्सव समिती, विश्वकर्मा सेवा संघ व श्री विश्वकर्मा समाजातर्फे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. श्री विश्वकर्मा जयंती समिती बेळगावचे अध्यक्ष राघवेंद्र हवनूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta